शिक्षक बॅंकेचे नूतन चेअरमन व पतसंस्था संचालकांचा नवे दानवाड येथे सत्कार
शिक्षक बॅंकेचे नूतन चेअरमन व पतसंस्था संचालकांचा नवे दानवाड येथे सत्कार
नवे दानवाड : कुमार विद्या मंदिर नवे दानवाड यांच्या मार्फत दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे नूतन चेअरमन सुनिल एडके तसेच शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था कुरुंदवाडचे नूतन संचालक सुभाष तराळ,धोंडीराम बाबर,अशोक कोळी,बाळासो यादव,चंद्रकांत कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तीनी संस्थेच्या सभासदांसाठी व संस्थेसाठी विविध योजनांद्वारे सभासदाभिमुख कार्याद्वारे आपली निवड सार्थकी ठरवू. असे अभिवचन त्यांनी दिले.
यावेळी बोलताना शिक्षक बँकेचे चेअरमन सुनिल एडके म्हणाले,
शिक्षक बॅंकेची यशस्वी घौडदौड सुरु झाली आहे. बँकेचा नफा वाढवून व्याजदर ७ % दिलेला आहे. नफा वाढवून लाभांश देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठेवी व कर्ज वसुलीची उद्दीष्टपूर्ती कर्मचाऱ्यांनाही दिलेली आहे. शाळेने सन्मान केल्याबद्दल धन्यवाद दिले.
याप्रसंगी मुख्याध्यापक मारुती कोळी,केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे,भालचंद्र खोत,दिलीप शिरढोणे, काशीनाथ मोडके,विद्या सुतार,प्रतिभा मलकाने,कल्पना चौगुले,विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक कुमार सिदनाळे यांनी केले तर आभार पुष्पा बाबर यांनी केले.