महावीर कांबळे सरांनी ४० वर्षाची उत्कृष्ट सेवा केली- चेअरमन रावसाहेब पाटील
महावीर कांबळे सरांनी ४० वर्षाची उत्कृष्ट सेवा केली- चेअरमन रावसाहेब पाटील
कुरुंदवाड:साने गुरुजी शिक्षण संस्था कुरुंदवाड संचलित साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड मधील सहाय्यक शिक्षक महावीर शंकर कांबळे यांनी संस्थेच्या मुख्य शाखेमध्ये सात जुलै 1983 रोजी सुरुवात केली.त्यांनी संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ तसेच हेरवाड हायस्कूल हेरवाड या तीन शाखेमध्ये एकूण 40 वर्षे सेवा केली त्याप्रित्यर्थ शाळेने त्यांचा यथोचित सत्कार केला. प्रारंभी साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित पाटील,संचालक सतिश पोतदार,संदीप आवटी,राजू आलासे,मुख्याध्यापक -ललिता निर्मळे,माणिक नागावे,यादव मॅडम,श्रेणिक डिग्रजे,शिक्षक उपस्थित होते.
प्रारंभी ललिता निर्मळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महावीर कांबळे सरांचे शाळेविषयी असलेले योगदान त्यांनी स्पष्ट केले.शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून कांबळे सरांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.न्यू इंग्लिश शेडशाळचे मुख्याध्यापक श्रेणिक डिग्रजे यांनी मनोगत व्यक्त करत असताना ते एक उत्तम शिक्षक, सांस्कृतिक,बौद्धिक,शैक्षणिक सर्व क्षेत्रात प्रभावी काम केले. उत्तम निवेदक,गायक व विविध प्रकारच्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणारे आहेत.
सत्कार प्रसंगी महावीर कांबळे यांनी आपल्या शैक्षणिक जीवनाचा प्रवास कसा झाला? आपण याच शाळेतून शिकलो. व याच शाळेत आपण संस्थेमध्ये कार्यरत राहिलो.संस्थेने ज्या ज्या वेळी जी जी जबाबदारी दिली ती उत्कृष्टपणे त्यांनी पार पाडलेले आहे.त्यांच्यापासून अनेक चांगले विद्यार्थी घडलेले आहेत. वकील, इंजिनिअर,डॉक्टर,शिक्षक, प्राध्यापक,प्रशासकीय,आयटी क्षेत्रात विविध पदावर कार्यरत आहेत संस्थेने या शाळेत काम करण्याची संधी दिली.त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये मला उत्कृष्ट कार्य करता आले. याबद्दल त्यांनी संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.संपूर्ण चाळीस वर्षाच्या सेवेमध्ये मी एकदाही दीर्घ रजा घेतलेली नाही. व सेवानिवृत्त होत असताना देखील शेवटच्या दिवसापर्यंत प्रामाणिकपणे काम केलेले आहे. असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
चेअरमन रावसाहेब पाटील यांनी यांनी संस्थेमध्ये योगदान दिलेल्या महावीर कांबळे सर यांच्या कार्याचे कौतुक केले.संस्थेची सेवा उत्कृष्टपणे केले असल्याचे उद्गार काढले. व पुढील जीवनाविषयी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रकाश मोहिते, हळींगळे सर,मुख्याध्यापिका निर्मळे मॅडम,कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका यादव मॅडम,न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ शाळेचे मुख्याध्यापक डिग्रजे सर, हेरवाड हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे,शामराव कांबळे,मनीषा कांबळे,आशा शिंदे,आप्पा बंडगर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सरांच्या कार्यांच्या गौरव केला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री पवार व निर्मळे मॅडम यांनी केले. विशेषत: त्यांचे सुंदर हस्ताक्षर याविषयी त्याने विशेष कौतुक केले. त्याबद्दल त्यांचा गटशिक्षणाधिकारी पाच्छापुरे साहेब यांनी यथोचित सत्कार केलेला होता.शाळेमधील परिपाठ,कवितांच्या चाली,सांस्कृतिक कार्यक्रम, स्काऊट गाईड, क्रीडा व वाचनालय तसेच राष्ट्रसेवा दलाची जी कामं आहेत.ती सर्व कामे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी हिरारीने भाग घेऊन संस्थेच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात वेळ देऊन संस्थेच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. अशा पद्धतीने त्याने गौरव उद्गार काढले.
त्यांच्या एकूण ४० वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी एकदाही दीर्घमुदतीची रजा घेतलेली नाही. हे त्यांच्या कार्याचे कौतुक आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी सेवेच्या शेवटच्या दिवसापर्यंत शाळेची सेवा केलेली आहे. हे एक विशेष आहे. शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय म्हणून संस्थेने त्यांना वेळोवेळी पुरस्काराने गौरविले आहेत. असे साधना मंडळ कुरुंदवाड मार्फत सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. असे शिक्षक आज नियत सेवानिवृत्त होत आहेत. सत्काराला उत्तर देताना एम. एस. कांबळे सरांनी सांगितले की संस्थेने ज्या ज्या वेळी मला प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि प्रेरणेमुळेच मला जे जे शक्य होईल.तेवढे मी विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे आणि त्याबद्दल मी संस्थेचा ऋणी आहे,कृतज्ञ आहे. अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली.