नूतन प्राथमिक शिक्षणाधिकारी मिना शेंडकर यांचा सत्कार.
नूतन प्राथमिक शिक्षणाधिकारी मिना शेंडकर यांचा सत्कार.
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन प्राथमिक शिक्षणाधिकारी मिना शेंडकर यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व छत्रपती शिवाजी प्राथमिक शिक्षक पतसंस्था कोल्हापूर यांच्या मार्फत सत्कार फरण्यात आला. व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी शिक्षक संघाच्यावतीने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.जिल्हा परिषदेकडून राबविल्या जाणाऱ्या गुणवत्ता वाढीसाठीच्या उपक्रमांना भरीव सहकार्य करण्याची भूमिका विशद केली. यावेळी मुख्याध्यापक प्रमोशन,५तारखेच्या आत पगार व्हावा.समाजशास्त्र विषय शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावावा. इत्यादी अनेक महत्वपूर्ण विषयांत लक्ष घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गुणवत्तावाढीचे उपक्रम व शिक्षकांच्या प्रश्नांच्या बाबतीत समन्वयाने काम करण्याचे अभिवचन शिक्षणाधिकारी शेंडकर मॅडमनी दिले.
यावेळी शिक्षक संघाचे राज्य संपर्क व शिक्षक बॅंकेचे संचालक एस.व्ही.पाटील, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाबूराव खोत,पार्लमेंटरी बोर्ड सदस्य विष्णू काटकर,जिल्हा परिषद सोसायटीचे मा. संचालक श्रीकांत वरुटे, बाजीराव जाधव,संस्थेचे सचिव मनोज माळवदकर,सल्लागार नारायण वडाम,एम.डी.पाटील, सचिन कांबळे उपस्थित होते.