Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

आई -वडील हेच खरे दैवत आहेत -अशोक कोकणे.

 आई -वडील हेच खरे दैवत आहेत -अशोक कोकणे.



दत्तवाड:आई - वडील हेच खरे दैवत आहेत.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रथमतः आई - वडीलांचे संस्कार महत्त्वाचे आहेत.महापुरुषांची विचारसरणी आत्मसात करणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक कोकणे यांनी केले.विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी मूल्यसंस्कार उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

           याप्रसंगी अशोक कोकणे यांच्या मार्फत सर्व मुलांना लेखन साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

              यावेळी पावडोबा विकास सेवा सोसायटीचे चेअरमन पांडुरंग चव्हाण होते.

स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे यांनी केले तर आभार अध्यापिका सरिता राजमाने यांनी मानले.