Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

कुरुंदवाडच्या फडणीस विद्या मंदिरचा वर्धापन दिन ,लो. टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती असा संयुक्तिक कार्यक्रम उत्साहात संपन्न.

कुरुंदवाड ता.१ 


:येथील शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडच्या कै.डॅा.रामचंद्र विठ्ठल फडणीस व कै.सौ.जानकीबाई रामचंद्र फडणीस प्राथमिक विद्या मंदिर कुरुंदवाडचा 33 वा वर्धापन दिन लो.टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे जयंती असा संयुक्तिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .

         या कार्यक्रमासाठी मा .श्री.सुशांत अरुण जाधव व मा .सौ.स्नेहल सुशांत जाधव हे उभयता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.संस्थेचे सेक्रेटरी मा. सीमा जमदग्नी,विश्वस्त श्रद्धा कुलकर्णी  उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री. सुशांत जाधव यांनी आपले वडिल कै.श्री.अरुण विश्वासराव जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ पहिली ते चौथीतील गणित विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर केले. याप्रसंगी आपल्या मनोगतात प्रमुख पाहुण्या स्नेहल जाधव म्हणाल्या, संस्कार घडवणारी शाळा म्हणजे फक्त प्राथमिक शाळाच होय. मनाचे श्लोक, मारुती स्तोत्र अशा संस्कारक्षम  गोष्टी फक्त प्राथमिक शाळेतच घेतल्या जातात.थोर नेत्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी केल्याने मुलांच्यात चांगले संस्कार होतात. बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन तर केलेच पण ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाली नाहीत त्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी तहानलेल्या हुशार कावळ्याची गोष्ट सांगून ,सतत प्रयत्न करून  यश मिळतेच .तुम्हीही पुढच्या वर्षी खूप बक्षीसे  मिळवा.असे उदगार काढले.

       


 गेल्या वर्षी इ.१ ली ते ४ थी  वर्गातील वार्षिक परीक्षेत उल्लेखनीय यश मिळालेल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना यावेळी पाहुण्यांच्या शुभहस्ते बक्षीस वाटण्यात आले. आदर्श विद्यार्थी, उत्तम व्यक्तिमत्व विद्यार्थी , विविध स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरावर झळकणारे विद्यार्थी यांना बक्षीसे दिली.या बक्षिसांचे वाचन दत्तात्रय कुरुंदवाडे यांनी केले.

       राजेंद्र देसाई , महावीर चौगुले यांनी मनोगत व्यक्त करून शाळेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

        या कार्यक्रमाला संस्थेचे सेक्रेटरी सौ.जमदग्नी मॅडम यांनी प्रमुख उपस्थितांच्या मनोगत मध्ये शाळेतील विद्यार्थी हा आदर्शवत घडावा यासाठी स्पोकन इंग्लिश , योगसोपान , कॉम्प्युटर कोडींग यासारखे अनेक उपक्रम चालू केले आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना प्रत्येक उपक्रमात सहभाग घेऊन त्यांचा विकास साधावा सर्व पालकांचे प्रेम असंच राहू दे असं पालकांना निवेदन केले. 

       यावेळी आराध्या जाधव हिने लो. टिळकांविषयी व माही कोळेकर हिने अण्णा भाऊ साठे यांच्या विषयी उत्कृष्ट भाषण केले .

        कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन शरदचंद्र पराडकर  यांची प्रेरणा व स्फूर्ती मिळाली . शिवाय परिसरातील अनेक प्रतिष्ठित व मान्यवरांनी शाळेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

         प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी काळे, विद्यासागर उळागड्डे,अनिल पांडव, सुनिल पवार,मालूताई गुरव,एस.पी.हायस्कूलचे अध्यापक सतीश माने व बहुसंख्य पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा औरवाडे तर आभार अनिता भोई यांनी मानले. कार्यक्रमांची सांगता कांचनमाला बाबर यांच्या वंदे मातरमनी झाली.