पूर्व प्राथमिक प्राथमिक शाळेने वृक्षांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरा केले
दत्तवाड
येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटी संचलित पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरे केले पर्यावरणामध्ये आपल्या सभोवती असणाऱ्या वृक्षवल्लीचे आपण संवर्धन व जपणूक केली पाहिजे ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या मनावर ठसावी म्हणून वृक्षांना राखी बांधून संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे वृक्ष ही आपले सगळे सोयरे आहेत त्यांच्यापासून आपणाला शुद्ध हवा धनधान्य फळे पाऊस सावली व चांगले लाकूडफाटा मिळतो इतकं सर्व देण्याची ताकद निसर्गात वृक्षांकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेने वृक्षांला नेजे हायस्कूलचे पर्यवेक्षक डी बी रायनाडे व खजिरे सर यांच्या हस्ते राखी बांधून आपली सामाजिक बांधिलकी जपली .
अक्काताई नाना नेजे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय तावदारे, प्राथमिकचे मुख्याध्यापक अभिजीत मालगावे यांच्या मार्गदर्शन व प्राथमिक शाळा समितीचे चेअरमन अजित चौगुले, सर्व सदस्य यांचे प्रोत्साहन लाभले आहे .
यावेळी सर्व शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते.