Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्त जवानांचे अनोखे स्वागत

सैनिक टाकळी( प्रतिनिधी)


सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची अनेकांची स्वप्ने असतात. पण प्रत्येकाचंच  हे स्वप्न

पूर्ण होत नाही. सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतात. पण हा सैनिक  सेवानिवृत्त होऊन  पुन्हा एकदा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचं ऊर अभिमानाने भरुन येतं. हवालदार वसंत पाटील हे १७ मराठा जवान सैन्या मधील आपली वीस वर्षाची देश सेवा करून  सेवानिवृत्त झाले .  त्यांच्या दहावी मधील ९८-९९ सालातील  वर्ग मित्रांनी सत्कार समारंभ आयोजित केला . त्याच्यासोबतच त्यांच्या बॅचचे रिटायर झालेले हवालदार विजय पाटील, हवालदार दीपक पाटील व हवालदार जनार्दन पाटील यांची सुद्धा गावातून काढलेली मिरवणूक बऱ्याच दिवसातून टाकळीकरांच्या भावना उत्तेजित करणारी होती.   सैनिक परंपरा असलेल्या या गावातून बरेच जवान भरती होतात आणि रिटायर्ड पण होतात त्यांचा भरती होताना आणि रिटायर्ड होताना झालेला सत्कार हा त्यांना त्यांच्या पुढील जीवनासाठी प्रेरणा देणारा असतो.   सैनिक टाकळी चे शेकडो तरुण आज देशसेवेसाठी सैन्य दलात आहेत. कर्तव्य बजावत येथील 18 जवानांनी आजपर्यंत आपलं बलिदान दिले आहे. मात्र २० वर्षे देशसेवा करून सुखरूप परतणाऱ्या जवानाचं अनोखं स्वागत करून सैनिक टाकळीच्या दहावीच्या ९८-९९ च्या वर्ग मित्रांनी पायंडा पाडलेल्या प्रथेची चर्चा मात्र  गावात रंगली आहे. यापुढे पण गावातील जवान भरती होतील किंवा रिटायर्ड होतील त्यांचा असाच प्रकारे सत्कार सर्व गावाच्या एकजुटीतून व्हावा हीच नागरिकांची अपेक्षा आहे.