Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

मुलांनी मोबाईलचा वापर टाळून अधिक अभ्यास करावा व यश मिळवावे -उपसरपंच प्रकाश रायनाडे श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

 

दत्तवाड


श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली संचालित श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट येथे इंग्लिश स्पेलिंग कॉम्पिटिशन व जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे  अकिवाट गावचे नूतन उपसरपंच प्रकाश रायनाडे व पत्रकार मिलिंद देशपांडे हे उपस्थित होते.


विद्यासागर हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी विविध उपक्रम घेण्यात येत असतात त्यापैकीच एक इंग्लिश स्पेलिंग पाठांतर घेण्यात आली स्पर्धा या स्पर्धेत विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी जवळपास 100 विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवली तसेच कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत विद्यालयातून एकूण वीस विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते त्यापैकी एकोणीस विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्याबद्दल त्या सर्वच विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला 

यावेळी क्रीडा अध्यापक जी आर चावरे यांचा  सत्कार करण्यात आला.

  नूतन उपसरपंच प्रकाश रायनाडे यांनी विद्यालयात घेण्यात आलेल्या उपक्रमांचे कौतुक केले तसेच मुलांपेक्षा मुलींनी अधिक बक्षीस मिळवले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व मुलांनी मोबाईलचा वापर टाळून  अधिक अभ्यास करावा व यश मिळवावे असे सांगितले .

 पत्रकार मिलिंद देशपांडे  यांनी मुलं देखील मुलींपेक्षा कमी नाहीत ते तुम्हाला दहावीच्या निकालामध्ये दाखवून देतील असे सांगून मुलांना प्रोत्साहन दिले व पत्रकारिता व्यवसाय करताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत पत्रकारिता व्यवसाय कसा असतो त्यासाठी काय केले पाहिजे असे सविस्तर विवेचन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  मुख्याध्यापक डी बी वाडकर यांनी  विद्यार्थ्यानी शाळेत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमात उस्फुर्तपणे सहभागी होऊन प्रगती करावी व आपला विकास करून घ्यावा. असे मनोगता सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत प्रास्ताविक एस ए. नरखडे तर आभार सौ जे एस गीताजे यांनी केले यावेळी पर्यवेक्षक एम बी पाटील  सर्व अध्यापक अध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.