Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

आलास उर्दुच्या विद्यार्थ्यांनी केला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा अनुभव.

 आलास उर्दुच्या विद्यार्थ्यांनी केला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा अनुभव.

आलास:


 उर्दू विद्या मंदिर आलास येथे 26 ऑगस्ट 2023 रोजी देशातल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये जसे मतदान यंत्राचा वापर करून निवडणूक घेतली जाते. तसा मोबाईल ॲप च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान घेण्यात आले.निवडणूक निरीक्षक म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जबीन मेहबूब मुजावर,यंत्र निरीक्षक व यंत्र व्यवस्थापनाचे सर्व कार्य प्रमुख श्री.इमरान खान जमादार यांनी काम पाहिले.सर्व नियोजन सोहेल पटेल सर व जहीर पटेल सर यांनी पाहिले.ज्येष्ठ शिक्षिका सौ.नसरीन करीमखाँ व तसनीम पटेल मॅडम यांनी मुलांना सर्व नियोजन व शिस्तबद्ध कार्य कसे होईल?हे पाहिले. तसेच फोटो व व्हिडिओची सर्व जबाबदारी तय्यबा साहेब वाले यांनी पाहिली. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांचे सहभाग लाभले .

                    निवडणूकीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी उभी असलेली विद्यार्थिनी कुमारी सुफीया सादिक मुजावर व उपमुख्यमंत्री पदासाठी उभा असलेला विद्यार्थी कुमार अस्जत जावेद मकानदार दोन्हीही इयत्ता सातवीचे विद्यार्थी यांची या पदावर निवड झाली अन्य मंत्री पुढील प्रमाणे - अभ्यास मंत्री अशरफ जहाँ मकानदार, परिपाठ मंत्री महमुदा मुजम्मिल साहेब वाले,सांस्कृतिक मंत्री उजमा जमीर मकानदार व खीज़र जावेदपाशा पाटील,पर्यटन मंत्री ताहीर इस्माईल साहेबवाले, स्वच्छता मंत्री समद चांदसाहेब शिकलगार,पर्यावरण मंत्री जहूर अहमद रियाज अहमद शेख, क्रीडामंत्री सफवान इम्रान शेख व स्वागत मंत्री सादिया गौस शेख अशारीतीने सर्व मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले.सर्वांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान अनुभवला.

                  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ.जबीन मुजावर मॅडम यांनी काम पाहिले. निवडणूक अधिकारी म्हणून सर्व शिक्षकांनी काम पाहिले.जसे त्यांचे पालक बटन दाबून मतदान करतात तसे बटन दाबून मतदान करताना विद्यार्थ्यांना आनंद झाला.शाई लावलेली बोट दाखवत त्यांनी फोटो काढून घेतले.निवडणूकीपूर्वी सर्व मुलांना कल्पना देण्यात आली. उमेदवार व चिन्ह यादी प्रकाशित करण्यात आली.इयत्ता पहिलीपासून सर्व मुलांनी उमेदवाराचे नाव व चिन्ह पाहून त्यांच्या समोरील निळे बटन दाबून मतदानाची कर्तव्य पार पाडले मतदान झाल्यानंतर बीप च्या आवाजाने त्यांचा उत्साह वाढत होता.एकूणच ही निवडणूक त्यांना एक नवीन अनुभव देऊन गेली तसेच खाते वाटप करून शपथविधी सोहळा घेण्यात आला.अशाप्रकारे निवडणूक प्रक्रिया संपूर्ण आनंदमय वातावरणात पार पडली.