Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

श्री दत्त कारखान्याच्या संशोधन पेपरला द्वितीय क्रमांकाचे 'सर्वोत्कृष्ट पेपर पारितोषिक' जाहीर


शिरोळ/प्रतिनिधी:


      डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) च्या वतीने आयोजित केलेल्या सर्वोत्कृष्ट पेपर पारितोषिक मध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सादर केलेल्या संशोधन पेपरला कृषी विभागामधील 'डी. एस. टी. ए. पारितोषिक- के. पी. देशमुख स्मृती पुरस्कार' हे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट असोसिएशनच्या 67 व्या वार्षिक अधिवेशनात याचे वितरण होणार आहे.

      "श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात आलेल्या ऊस उत्पादनावर आणि उत्पादकतेवर प्रभाव टाकून क्षारयुक्त मातीच्या पुनरुत्पादनावर सब-सरफेस ड्रेनेज (एसएसडी) प्रकल्पाचा केस स्टडी" या शिर्षकाखालील संशोधन पेपरला तज्ज्ञ परीक्षकांनी 'सर्वोत्कृष्ट पेपर पारितोषिक' साठी निवडले आहे.  

     दि. 24 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जे. डब्ल्यू. मॅरियट, पुणे येथे बक्षीस वितरण होणार आहे. अशी माहिती कार्यकारी सचिव गौरी पवार यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

     श्री दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमीन क्षारपड मुक्तीचा प्रकल्प कारखाना परिसर आणि इतर ठिकाणी राबविण्यात येत असून यामध्ये आठ हजार एकराहून अधिक जमीन क्षार मुक्त झाली आहे.  तीन हजार पाचशे एकरावर प्रत्यक्षात उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांनी सुरू केले असून याचा फायदा शेतकऱ्यांना होऊन त्यांच्यामध्ये आर्थिक सुबत्ता येत आहे. डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) ने याची दखल घेऊन या पारितोषिकासाठी निवड झाल्याने चेअरमन गणपतराव पाटील आणि दत्त समूहाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.