महिला सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य : अमरसिंह पाटील शिरोळात महिलांसाठी पंतप्रधान स्व निधी योजना कार्यशाळा संपन्न
शिरोळ : प्रतिनिधी :
बचत गटातील महिला सक्षमपणे कशा उभा राहतील यासाठी एका वर्षात सखोल मार्गदर्शन व विविध
योजनांची माहिती घेवून अभ्यासपुर्ण बचत गट तयार करावा . यासाठी नगरपालिकेचे सर्वतोपरी सहकार्य करू तसेच महिलांना सशक्त आरोग्य लाभावे याकरिता २ ऑक्टोंबर रोजी महिलांच्यासाठी विशेष आरोग्य शिबिर घेणार असल्याची घोषणा प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केली .
दिनदयाळ अंतोदय योजना नागरी उपजिविका योजना पंतप्रधान स्वनिधी योजना फेरीवाले , पथ विक्रेते विनातारण कर्ज योजना याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी शिरोळ नगरपषिदेच्या वतीने महिलांच्यासाठी कलेश्वर मंदिरात कार्यशाळा पार पडली . या समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे बोलत होते
महिलांच्या या कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते बाबासो नदाफ ,मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांनी मनोगत व्यक्त करून महिलांना पंतप्रधान स्व निधी योजना फेरीवाले पतविक्रेतांना विनाकारण कर्ज यासह शासनाच्या विविध योजनेची माहिती दिली व आपल्या प्रगतीसाठी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले . तसेच उपस्थित अधिकारी यांनी सुद्धा महिलांना मार्गदर्शन केले
यावेळी उपनगराधक्षा सौ. करुणा कांबळे , सहकार्याध्यक्षा अश्विनी पाटील, आय सीआय सीआय बँकेचे श्री इनामदार , तालुका अभियान व्यवस्थापक स्मिता कांबळे, जायटंस सहेलीच्या हेमलता जाधव, मुख्य मंत्री कल्याण कक्ष कोल्हापूरचे अधिकारी गणेश कोळेकर , बाळासो माने , शुभांगी देशमुख, स्नेहलता खातेदार, शुभांगी कोळी , सुरेश कांबळे, कपिल माने रफीक शेख, जाधव मॅडम , म्हैशाळे सर यांच्यासह शिरोळ शहरातील बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या .