कृष्णामाई पतसंस्थेचे वार्षिक सभा उत्साहात संपन्न*
अकिवाट प्रतिनिधी/
अकिवाट येथील कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न झाली. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व संस्थेचे प्रेरणास्थान प.पु.स्वस्तिश्री जगद्गुरु चारुकिर्तीजी भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ,श्रवणबेळगोळ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सभेचे नोटीसितील एकूण नऊ विषय संस्थेचे जनरल मॅनेजर श्रेणिक शिरगुप्पे यांनी वाचून दाखवली.यावर चर्चा होऊन सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूरी दिली.यावेळी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रायनाडे म्हणाले की संस्थेचे एकूण सभासद २०२७, भागभांडवल रूपये १,०३,७९,६००/- ,ठेवी रूपये ३१,६२,८३,३९८.५८ कर्जे रूपये २२,३७,४६,४८४.००, गुंतवणूक रुपये १२,०८,१५,१७२.०० असुन नफा रुपये ५४,७६,८०६.७७ इतका झाला असल्याचे सांगितले. डिव्हिंडड १० टक्के देत असुन व्यवसाय वाढीसाठी कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रसाठी प्रस्ताव सादर केला असल्याचे बोलताच सभासदांनी एकमुखीने त्यास मंजुरी दिली. शितल हळिंगळे,आण्णाप्पा पाणदारे,सागर चौगुले,विराज कल्लण्णावर, रमेशकुमार मिठारे,अक्षय चौगुले, पंकज ऐवळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.संचालक- ए.ए.रायनाडे सर,के.बी.पाटील सर, आदिनाथ होसकल्ले, रमेशकुमार मिठारे, संस्थेचे लेखापरीक्षक चार्टर्ड अकोन्टंट सुचीत हेरवाडे,शितल हळिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.संचालक-विद्यासागर चौगुले, सुभाष सुतार,लहु कांबळे,सुशीला कोथळी, शोभाताई शिरगुप्पे,दादासो लडगे,अकिवाट, टाकळी, खिद्रापूर,बस्तवाड, जयसिंगपुर,कुरूंदवाड शाखेचे सल्लागार, सभासद , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत आप्पासाहेब फरांडे यांनी केले तर आभार राजेंद्र सुनगार यांनी मानले.