छत्रपती शिवाजी शिक्षक पतसंस्थेला ९लाख१३ हजारचा घसघशीत नफा दशकपूर्तीचा टप्पा ओलांडून संस्थेने केली यशस्वी घोडदौड -संस्थापक चेअरमन एस.व्ही. पाटील रविवारी जनरल सभा
कोल्हापूर :
येथील छ.शिवाजी शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्था स्थापनेनंतर सतत चढता आलेख प्रस्तावित करत संस्था दशकपूर्तीचा संकल्प पूर्ण करून पुढील वाटचाल करत आहे. अल्पावधीत छत्रपती शिवाजी शिक्षक पतसंस्थेने केलेल्या भरीव,पारदर्शी व विश्वासार्ह कारभारामुळेच संस्थेला सन २०२२- २३या आर्थिक वर्षात९ लाख १३हजारचा घसघशीत नफा झाल्याची माहिती संस्थापक चेअरमन एस. व्ही. पाटील व संचालक मंडळाने प्रसिद्धीस दिली आहे.चेअरमन पाटील म्हणाले,
यावर्षी सभासदांना १७% डिव्हिडंट प्रस्तावितआहे.तसेच संस्थेने ऑगस्ट २०२३अखेर ८ कोटी ७५लाख ३२हजार इतक्या रकमेचा कर्ज पुरवठा करून मुदतबंद ठेवीचा८कोटी ९०लाख ८७ हजाराचा टप्पा ओलांडला आहे.संस्था सभासदांना विविध स्वरूपातील कर्ज म्हणून ३२ लाख रुपये उपलब्ध करून देत आहे.या संपूर्ण कर्जाला संस्थेने १००% कर्जमाफी योजनाही राबविली आहे.दहा वर्षात एवढा उच्चांकी कर्ज पुरवठा करणारी ही जिल्ह्यातील पहिली पतसंस्था आहे.सेवानिवृत्त शिक्षक सभासदांना १ लाखापेक्षा ज्यादा रक्कम कर्ज म्हणून दिली जात नव्हती पण संस्थेने सभासदांची अडचण विचारात घेऊन रुपये तीन लाख रुपये कर्ज पुरवठा करत महाराष्ट्रात अव्वल बनण्याचा संकल्प पूर्ण केला आहे.तसेच शिक्षकांनी संगणक साक्षरतेसाठी कितीही किमतीचा लॅपटॉप घेतल्यास सभासदांना तो बिनव्याजी रक्कमेत उपलब्ध करून देण्याचा संकल्प संस्थेने पुर्ण केला आहे.तसेच सभासदाला शाळेपर्यंत दिवाळी भेटवस्तू पुरवठा करणारी संस्था म्हणून संस्थेने आपला एक वेगळा नावलौकिक प्रस्तावित केला आहे.संस्थेने सामाजिक जाणिवेतून करवीर पंचायत समितीच्या आवारात पाणपोई सुरू करून शिक्षण विभागाच्या सहकार्याने थंडगार पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून दिली आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या साठी शिष्यवृत्ती चाचण्या व शिक्षकांच्यासाठी बहुउपयोगी उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.तसेच संस्थेने नजीकच्या कालावधीत संस्थेसाठी स्वमालकीची वास्तू घेण्याचा संकल्प केला आहे.संस्थेला सतत ऑडिट वर्ग 'अ 'आहे.अल्पावधीत१७% डिव्हिडंड देणारी संस्था,संचालक प्रवास ०% टक्के,एनपीए -०टक्के,
१००% टक्के कर्जमाफी योजना,भरघोस लाभ देणारी प्राव्हिडंड फंड योजना,तात्काळ कर्जपुरवठा,
सभासद व मुलांच्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गुणगौरव करण्यात येणार आहे.
अशा पद्धतीने दशकृतीच्या टप्पा ओलांडलेल्या आमच्या संस्थेची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २४/०९/२०२३ रोजी सकाळी ११.३०वाजता श्री केदारनाथ सांस्कृतिक भवन पोवार कॉलनी,क्रशर चौक, राधानगरी रोड,कोल्हापूर
या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे.असे आवाहन केले आहे.
यावेळी व्हा.चेअरमन बाबुराव खोत,संचालक बाळासाहेब माने,राजाराम घुंगुरकर,प्रकाश गायकवाड,गोपाळ कदम,संभाजी एकशिंगे, रामचंद्र माने,अनिल वरूटे,पद्माताई काळुगडे,माया भिसे,सचिव मनोज माळवदकर,पार्लमेंटरी बोर्ड सदस्य विष्णू काटकर,एकनाथ पाटील,शिवाजी खाडे, काशिनाथ कुंभार,बजरंग कुलगुडे,मारुती माने,अर्जुन कराड उपस्थित होते.