शिरोळ पंचायत समिती मार्फत गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न.
शिरोळ :
पंचायत समिती शिरोळ मार्फत इयत्ता ४थी व ७वी प्रज्ञाशोध परीक्षा व इयत्ता ५वी व८वी शिष्यवृत्ती परिक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पंचायत समिती सभागृहात संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी शंकर कवितके,सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप पाटील,माजी पंचायत समिती सभापती मल्लाप्पा चौगुले उपस्थित होते.
गटविकास अधिकारी शंकर कवितके म्हणाले, शिक्षकांनी महापूर, कोरोना काळात झालेले अभ्यासाचे नुकसान भरुन काढून गुणवत्ता दाखवून दिली. हा शिक्षकांचा सन्मान आहे. मूलभूत गरजा मध्ये शिक्षण व आरोग्याचाही समावेश केलेला आहे. शिष्यवृत्ती परिक्षेला शैक्षणिक जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. दरवर्षी शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा ताठपणाने टिकविण्याचे श्रेय शिक्षकांना आहे.दिशा दाखविण्याचे कार्य शिक्षक करीत असतात. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या चारही शिक्षकांचे महत्वाचे योगदान आहे. शिक्षक अंतःप्रेरणेने काम करीत आहेत.
सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदिप पाटील यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
माजी सभापती मल्लाप्पा चौगुले म्हणाले, खाजगी शाळांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे पट टिकविण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांच्याप्रती योग्य ते मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शिक्षक पार पाडत आहेत. मुली कशातही कमी पडू नयेत. अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेत. याचा अभिमान वाटतो.
प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनी प्रज्ञा शोध परीक्षा आयोजनामागील उद्देश्य स्पष्ट केला.पंचायत समितीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त करून अभिनंदन केले. शिक्षक बॅंकेचे चेअरमन सुनिल एडके यांनी सांगितले की मुलांची तुलना दुसऱ्या मुलाबरोबर करु नये. त्याची स्पर्धा स्वतःशीच करायची सवय पालकांनी लावली पाहिजे.मुलांच्यात आत्मविश्वास पालकांनी रुजविण्याची गरज आहे. यश-अपयश पचविण्याची सवय लावली पाहिजे.
शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत म्हणाले, कोरोना काळात शिक्षकांनी केलेले कार्य वाखाणण्यासारखे आहे. महापूराच्यावेळी दिलेले हे योगदान आहे.उन्नतीचा ध्यास पाहून आनंद वाटतो.गुणवत्ता सुधारली त्याचे सर्व श्रेय विद्यार्थी,शिक्षक,पालक,शिक्षक पतसंस्था,शिक्षक संघटनांचे अनमोल योगदान आहे.
प्रास्ताविक गट शिक्षण अधिकारी -भारती कोळी यांनी केले.तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा चढता आलेख सांगून सत्कार समारंभ आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.गुणवत्ता वाढीसाठी कौतुक करण्याची ही गरज असते. स्पर्धात्मक परीक्षेसाठी ते प्रेरक ठरते.
याप्रसंगी शिक्षक बँक संचालक सुरेश पाटील,दिलीप पाटील,मनोजकुमार रणदिवे, विजय भोसले,शिवाजी ठोंबरे, रईस अहमद पटेल,राजाराम सुतार,रमेश शंकर कोळी, मदनकुमार कांबळे,रियाज अहमद चौगले,महंमदअसिफ मुजावर,दिलीप शिरढोणे यांचेसह गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक,पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभासाठी शिक्षक बॅंक, कुरुंदवाड शिक्षक पतसंस्था,बॅ. खर्डेकर शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्था व साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महंमदहनिफ मुल्ला,संतोष जुगळे,सुरेश पाणदारे,नामदेव सन्नके,सतिश नलवडे,राजेंद्र नाईक,लक्ष्मीकांत हंकारे,शरद सुतार,सर्व मोबाईल टीचर,कार्यालयीन कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
परीक्षा विभागप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांनी स्वागत केले.तर केंद्रप्रमुख अण्णा मुंडे यांनी आभार मानले.ईशस्तवन प्रकाश रत्नाकर यांनी केले.सूत्रसंचलन किरण पाटील व महेश घोटणे यांनी केले.