Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

शिरोळ शासकीय आयटीआयच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा,पदवीदान सभारंभ उत्साहात संपन्न

शिरोळ : प्रतिनिधी 


         प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माध्यमातून युवक युवतींमध्ये कौशल्य विकासाविषयी    शिरोळ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली "पीएम स्किल रन" ही मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. मॅरेथॉन स्पर्धेची सुरवात  उदघाटक युवा नेते पृथ्वीराज यादव, उद्योजक भरत माणगावे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झेंडा फडकावून करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्था व्यवस्थापन समितीचे चेअरमन एन.डी. डीसले होते. या स्पर्धेत शासकीय तसेच तालुक्यातील खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या एकूण ३८९ विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, मॅरेथॉन स्पर्धेनंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने पदवीदान समारंभ संपन्न झाला.

          युवा नेते पृथ्वीराज यादव म्हणाले, राज्य शासनाने कौशल्य प्रशिक्षणावरती अधिक भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी.एम. विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन करण्यात आले आहे. या योजनेमध्ये पारंपरिक कारागीर तसेच १२ बलुतेदारांना कोमाल्य प्रशिक्षणा बरोबर आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत कोशल्यपूर्ण भारताचे स्वप्न लवकरच अस्तीत्वात येणार आहे. 

            यावेळी उद्योजक महेश पाटील, प्रासादिती मेडिकल ईक्लिपमेंटच्या प्रमुख अदिती कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. पी.एम. स्किल रन जनजागृती उपक्रमात मॅरथॉनमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थ्यांना युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे परितोषिक देऊन गौरवण्यात आले.

         कार्यक्रमास प्राचार्य एम.बी.जोशी, प्रभारी प्राचार्य अजित हिरुगडे, पद्मटेक इंडस्ट्रीचे चेअरमन भरत माणगावे, पूजा इंडस्ट्रीचे चेअरमन काव्यश्री नलवडे, यस इंडस्ट्रीजचे रामदास काळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुनील देशमुख, अभिजीत गुरव, यांच्यासह विद्यार्थी,विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.