उद्योगपती राजेंद्र प्रसाद जांगिड यांच्याकडून आनंदीबाई कर्वे शाळेस खुर्च्या भेट.
इचलकरंजी:
शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपती राजेंद्र प्रसाद जांगिड यांनी शहरातील आनंदीबाई कर्वे शाळा क्रमांक १० या शाळेस स्वखर्चाने फायबरच्या दहा खुर्च्या भेट म्हणून दिल्या.
याबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापक विलास रामाणे यांच्या हस्ते राजेंद्र जांगिड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विलास रामाणे,अमोल तोडकर,सौ.शैलजा पाटील मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेची प्रगती विशद करून मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.सदरची मदत मिळवून देण्यात अमोल तोडकर यांचे सहकार्य लाभले
उद्योगपती राजेंद्र प्रसाद जांगिड यांनी शाळेने राबविण्यात आलेल्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. तर शाळेच्या सर्व उपक्रमांत हिरीरीने भाग घेवून योगदान देणारे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीकांत यवलूसकर यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी फिरोज कनवाडे,संभाजी डाकरे,स्नेहा दिवटे,स्वाती मोरे,मंजिरी कमते, सायरा मुजावर,उज्वला सरदेसाई,स्वप्नगंधा शेळके,विद्यार्थी,पालक उपस्थित होते.