जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था सहकारातील दिपस्तंभ -बाबासो रणसिंग.
इचलकरंजी :
येथील जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्थेने अवघ्या ६ वर्षात१६०० इतके सभासद संख्या असून भागभांडवल१,२८,४९,१००इतके आहे. नफा ३०,२०,९७९ इतका मिळवला आहे. सभासदांना कर्ज, पगारतारण, शैक्षणिक कर्ज,सोने तारण, वाहन तारण,स्थावर तारण कर्जे, वितरीत करण्यात येते.संस्थेने अल्पावधीत केलेली नेत्रदिपक कामगिरीने सहकारातील दिपस्तंभ असल्याचे सिध्द केल्याचे प्रतिपादन पुरोगामी शिक्षक संघटनेचे पन्हाळा तालुकाध्यक्ष बाबासो रणसिंग यांनी केले.
जिजाऊ महिला नागरी पतसंस्थेला दिलेल्या भेटीप्रसंगी बोलत होते.चेअरमन जया अशोक कोळी यांचा सत्कार सर्टीफाईड ऑडिटर तानाजी पायमल यांचे हस्ते करण्यात आला.
संस्थापक अशोक गणपती कोळी,चेअरमन जया कोळी व सचिव विश्वनाथ पाटील यांनी संस्थेची माहिती दिली. यावेळी दिलीप शिरढोणे उपस्थित होते.