अल्पावधीत१७ टक्के लाभांश देणारी स्ट्रॉंग पतसंस्था म्हणून शिवाजी पतसंस्थेने केलेलं काम नावलौकिक वाढविणारे आहे".- चंद्रकांत वाघमारे -अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे
कोल्हापूर :
छत्रपती शिवाजी शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेने अवघ्या दहा वर्षात केलेली सर्वंकष प्रगती व सभासदांच्या साठी दिलेल्या सोयी- सुविधा पाहता संस्थेने शिक्षकांच्यातील एक स्ट्रॉंग पतसंस्था म्हणून केलेला नावलौकिक कौतुकास्पद आहे.असे उद्गार पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी काढले.ते पुढे म्हणाले सेवानिवृत्तांना रुपये ३लाख कर्ज व सभासदांनी संगणक साक्षर व्हावे.यासाठी बिनव्याजी लॅपटॉप साठी दिलेले कर्ज.या योजना म्हणजे सेवानिवृत्तांना दिलासा व सेवेतील सभासदांना उन्नतीसाठी दिलेली शाबासकी आहे.याबद्दल संस्थापक चेअरमन एस.व्ही. पाटील व संचालक मंडळाला मन:पुर्वक धन्यवाद देतो. छत्रपती शिवाजी शिक्षक पतसंस्थेने दशकपुर्ती सभेच्या निमित्ताने आयोजित विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक व सेवानिवृत शिक्षकांच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी चंद्रकांत वाघमारे व त्यांच्या सुविध्य पत्नी ललिता वाघमारे यांचा सन्मानपत्र देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना करवीरचे गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील म्हणाले,संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा पाहता नवीन संस्था उभा करून ती नावारूपाला आणून तिला जनमान्यता मिळवणे कठीण असतानाही छत्रपती शिवाजी पतसंस्थेने एस.व्ही.पाटील यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षात केलेले सभासदाभिमुख केलेले काम उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे.
यावेळी बोलताना संस्थापक चेअरमन एस.व्ही.पाटील म्हणाले,सभासदाभिमुख पारदर्शी कारभार,सभासदांनी एकमुखी व्यक्त केलेला विश्वास व संचालक मंडळाचे पाठबळ या जोरावरच दशकपूर्ती पूर्ण केली आहे.नजीकच्या कालावधीत संस्थेला स्वमालकीची इमारत व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा मानस आहे.याचबरोबर स्वतः सभासदांच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज पुरवठा करणारी नवीन योजना ही लॉन्च करण्यात आली आहे.त्याचाही फायदा सभासदांनी घ्यावा.असे त्यांनी आवाहन केले.सभेत खालील ठराव संमत करण्यात आले.-
1)संस्थेला स्वमालकीची इमारत घेणे.
2)संस्था सभासदांना उच्च शिक्षणासाठी कर्ज मंजूर करण्याचा ठराव एकमताने संमत.
3)विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे.
सभास्थळी संस्थापक चेअरमन एस.व्ही.पाटील यांनी संस्थेसाठी अविरत योगदान देऊन संस्था नावारूपाला आणल्याबद्दल बद्दल त्यांचा ही यथोचित गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी,शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध मध्ये मुले आणलेल्या मार्गदर्शक सभासद शिक्षकांचा,संस्थेचे सेवानिवृत्त सभासद तसेच विशेष सत्कार म्हणून संस्था स्थापनेपासून सहकार्य करणाऱ्या शाहूवाडी तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था,पी. सी.पाटील गुरुजी पतसंस्था गडहिंग्लज व सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक पतसंस्था कागल यांचे चेअरमन व व्यवस्थापक यांचा यथोचित सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
तसेच गव्हर्मेंट सर्व्हंट बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल अतुल जाधव यांचा व क्रांतीरत्ने पुस्तके लिहून क्रांतिकारकांची गाथा लोकांच्या समोर आणल्याबद्दल शिंदेवाडी शाळेच्या अध्यापिका प्रणिता तेली यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सचिव मनोज माळवदकर यांनी केले तर व्हा. चेअरमन बाबुराव खोत यांनी आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता रविंद्र कुंभार यांनी केले.यावेळी व्यासपीठावर गव्हर्मेंट सर्व्हंट बँकेचे चेअरमन अतुल जाधव,पिराजीराव पतसंस्था कागलचे चेअरमन आयलु देसा त्यांचे व्यवस्थापक संताजी पाटील,पी.सी.पाटील पतसंस्था गडहिंग्लजचे चेअरमन संभाजी पाटील,संचालक विजय शिंदे व व्यवस्थापक आप्पा शिवणे तसेच शाहूवाडी तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन जयसिंग पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त महादेव पाटील गुरुजी,महिला बँकेचे माजी व्यवस्थापक एम. एस. कुंभार,राजश्री शाहू पतसंस्थेचे माजी चेअरमन बी.जी.पाटील, पार्लमेंटरी बोर्ड सदस्य- विष्णू काटकर,एकनाथ पाटील,शिवाजी खाडे, काशिनाथ कुंभार,मारुती माने, बजरंग कुलगुडे,अर्जुन कराड तसेच संस्थेचे व्हा.चेअरमन बाबुराव खोत,संचालक बाळासाहेब माने,राजाराम घुंगुरकर,संजय बुड्डे,प्रकाश गायकवाड,संभाजी एकशिंगे, अनिल वरूटे,गोपाळ कदम, रामचंद्र माने,संजय वारके,पद्मावती काळुगडे,माया भिसे,भारती नानांचे,वंदना माने व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.