मुख्याध्यापक महामंडळाचे घोडावत विद्यापीठात अधिवेशन
सैनिक टाकळी (प्रतिनिधी)--
अखिल महाराष्ट्र माध्यमिक माध्यमिक व उच्च शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळातर्फे राज्यस्तरीय ६० वे शैक्षणिक संमेलन (वार्षिक अधिवेशन ) अतिग्रे(ता. हातकणंगले)येथील घोडावत विद्यापीठात १७ व १८ नोव्हेंबरला होणार आहे .राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते माजी कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर,उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्ह्यातील खासदार, आमदारआदींच्या उपस्थितीत वार्षिक अधिवेशन होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष के. एस. ढोमसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, 'जुनी पेन्शन योजना लागू करा, खासगी कंपन्यांमार्फत भरती करू नका, ,समूह शाळा योजनेला विरोध,नवे शैक्षणिक धोरणआदी विषयांवर अधिवेशन होणार आहे.
संमेलनाचे अध्यक्ष पदी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित समिती उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे तर स्वागताध्यक्ष उद्योपती संजय घोडावत आहेत.' यावेळी हिंदुराव जाधव, दत्तात्रय कदम,मनोहर पवार,विनोद पाटील, बबन काटकर,गौतम पाटील यांच्या सह राज्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.