चंद्रगोंडा रावसो पाटील यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान
दत्तवाड. मंदा देशपांडे
दत्तवाड चे सुपुत्र व शिरपूर येथील फार्मासिटिकल कॉलेजचे विभाग प्रमुख चंद्रगोंडा रावसो पाटील यांना शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चंद्रगोंडा पाटील हे मूळचे दतवाड येथील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण दत्तवाड येथील कुमार विद्यामंदिर येथे तर माध्यमिक शिक्षण श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल येथे झाले आहे. ज्युनिअर कॉलेज त्यांनी देवचंद कॉलेज अर्जुन नगर येथे पूर्ण करून बी फार्म कराड जिल्हा सातारा येथे केले आहे तर एम फार्म अहमदाबाद येथून पूर्ण करून शिवाजी विद्यापीठातून पीएचडी मिळवली आहे.
औषध निर्मिती शास्त्रामध्ये शिक्षणा दरम्यान प्रात्यक्षिकासाठी प्राण्यांचे विच्छेदन करावे लागते यासाठी काही प्राण्यांचा बळी जातो पण प्राण्यांचा बळी न घेता ही विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करणे सुलभ व्हावे यासाठी केलेल्या सॉफ्टवेअरची निर्मिती केली विज्ञान व तंत्रज्ञानाचा मेळ घडवून सिमुरेक नामक उंदरांच्या जैवसाम्य असलेल्या प्रतिकृती बनवली त्यांच्या संशोधनाने जिवंत प्राण्यांचा वापर न करता विशिष्ट औषधाचा जैव प्रणालीवर होणारा परिणाम अभ्यास करणे शक्य झाले आहे . प्राण्यांचा वापर न करता विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी एक्स कोलोजी व कॅल फॉर्म नामक सॉफ्टवेअर विकसित केले हे सॉफ्टवेअर नामांकित प्रकाशन कंपनी जगभर पोचवले फार्मा कोलॉजी अध्यापनासाठी जागतिक शैक्षणिक साहित्य ठरले आहे.
या कल्पकतेसाठी डॉ. पाटील यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
--------------------------------------------------------------
डॉ पाटील येथील गेले तेवीस वर्षापासून फार्मसी क्षेत्रात कार्यरत असून आर सी पटेल फार्मासिटिकल महाविद्यालय शिरपूरचे फार्माकॉलजी विभागाचे प्रमुख आहेत. यापूर्वी त्यांना होमिओपॅथी क्षेत्रातील संशोधन कार्याबद्दल भारत सरकारचा आयुष्य मंत्रालयाकडून देण्यात येणारा युवा वैज्ञानिक पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या नावे तीन भारतीय पेटंट आहेत. यापूर्वी ते विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.