Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वच्या अध्यक्षपदी डॉ अरविंद माने यांची निवड

शिरोळ : प्रतिनिधी : 


भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वच्या अध्यक्षपदी शिरोळचे नगरसेवक डॉ अरविंद अशोकराव माने यांची निवड करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी डॉ माने यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे या निवडीबद्दल डॉ अरविंद माने यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

शिरोळचे नगरसेवक डॉ अरविंद माने यांनी भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष म्हणून काम करीत असताना पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले शासनाच्या विविध योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले पक्ष वाढीसाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे त्यांच्या या कामाची दखल घेऊन भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या मान्यतेने भाजपा ग्रामीण पूर्वचे जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी नुकतेच पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या यामध्ये नगरसेवक डॉ अरविंद माने यांना उपाध्यक्ष पदावरून बढती देण्यात आली त्यांना भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली

भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींनी दाखवलेल्या विश्वासात पात्र राहून पक्ष वाढीबरोबरच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे शासनाच्या योजनेचा प्रत्येक नागरिकांना लाभ मिळावा पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य पर्यंत पोचवणे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी पक्ष नंबर एक होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन डॉ अरविंद माने यांनी जिल्हा अध्यक्ष पदाच्या निवडीनंतर बोलताना दिले आहे