Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

नशामुक्त भारत अभियानाचा लाभ घ्यावा : सुनिता दीदी ---- शिरोळ तालुक्यात २१ ऑक्टोबर अखेर अभियान ; शाळा , महाविद्यालयात चित्ररथासह प्रबोधन चळवळ

शिरोळ  : 


प्रतिनिधी प्रजापदा ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या

ब्रह्मकुमारी सेवा संस्थेचा वैद्यकीय विभाग व केंद्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने

कोल्हापूर जिल्ह्यात ९ ऑक्टोंबर पासून नशामुक्त भारत अभियान सुरु झाले आहे. त्याचाच भाग म्हणून शिरोळ येथील ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने शिरोळ तालुक्यात आज रविवार पासून २१ ऑक्टोंबर अखेर व्यसनमुक्त अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती अभियानाच्या संचालिका ब्रह्मकुमारी राजयोगिनी  सुनिता दीदी यांनी दिली.

     प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शिरोळ केंद्रात झालेल्या पत्रकार परिषदेत सुनीता दीदी बोलताना पुढे की म्हणाल्या  , भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत व्यसनमुक्त भारत अभियानसाठी नवी दिल्लीत ब्रह्माकुमारी संस्थेबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे.त्यामुळे ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने संपूर्ण देशभर हे अभियान राबवले जाणार आहे.  तरुण वर्गामध्ये व्यसन वाढले असून तंबाखू, गुटखा, सिगारेट , ड्रॅग ,दारू याबरोबरच मोबाईल सारख्या साधनांच्या आहारी गेला आहे.

     या व्यसनामुळे अनेक कुटूंबांना सामाजिक, आरोग्य, आर्थिक  समस्यांचा सामना करावा लागत आहे.  साडेतेरा लाख लोकांचा मृत्यू तंबाखूचे व्यसनामुळे होत आहेत. ही व्यसने दूर करण्यासाठी उचित मार्गदर्शन ,समुपदेशन ,औषधे सात्विक आहार  व योग आवश्यक आहे .हे सर्व मार्गदर्शन करण्यासाठीच ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान राबवले जाणार आहे. 

        नशामुक्त भारत अभियानाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठात  झाले असून त्यातील एक चित्ररथ रॅली हातकणंगले व शिरोळ  तालुक्यात आज रविवार पासून  २१ ऑक्टोंबर अखेर शिरोळ तालुक्यातील  सर्व गावातील माध्यमिक  विद्यालय व कॉलेजमध्ये जावून व्यसनमुक्ती विषयावर प्रबोधन करणार आहे. तेव्हा या अभियानाचा लाभ सर्वानी  घ्यावा असे  आवाहन सुनिता दीदी यांनी केले

            या पत्रकार बैठकीस मनीषा  बहेनजी ,  भक्ती बर्वे , ज्ञानेश्वर बर्वे  , शितल खोत  , डॉ वर्षा पवार , अर्चना बहेनजी   सचिन भाई आदि उपस्थित होते.