शिरोळ येथे श्री दुर्गामाता नवरात्रोत्सव सोहळा उत्साहात शिरोळ येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडचे आयोजन ; डॉ दगडू माने यांच्या हस्ते प्रतिमापूजन
शिरोळ : प्रतिनिधी
येथील शहर परिसरात अमाप उत्साहात व भक्तीमय वातावरणात श्री नवरात्रोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला . येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते . दरम्यान रविवारी पहिल्या दिवशी पत्रकार संघटनेच्या वतीने दुर्गामाता दौड निमित्त पहिले पुष्प वाहण्यात आले. यावेळी शिरोळ पंचायत समितीच्या कार्यालया समोरील महामानवांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार डॉ.दगडू माने यांच्या हस्ते करण्यात आले
आपण वाचत आहात जेडी न्यूज नेटवर्क यथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्यावतीने रविवारी पहाटे छत्रपती तख्त मधील छत्रपती ताराराणी , छत्रपती राजाराम महाराज यांच्या गादीचे दर्शन घेऊन दौड ला प्रारभ करण्यात आला. जय भवानी जय शिवाजी,,, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय,,,, असा जयघोष करीत शेकडो धारकर्यांच्या उपस्थितीत दौड काढण्यात आली. भगवे ध्वज हातात घेवून डोकीवर भगव्या टोप्या , फेटे व पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले धारकरी मोठ्या संख्येने दौड मध्ये सहभागी झाले होते.
शिरोळ पं स कार्यालयासमोर दुर्गामाता दौड आल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रेरणा मंत्र घेण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व गाव भागातील अंबाबाई देवीची आरती पत्रकार डॉ. दगडू माने यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई , शिरोळ तालुका प्रमुख प्रवीण चुडमुंगे यांच्यासह शहरातील ८० तरुण मंडळांचे धारकरी उपस्थित होते,
दरम्यान , शिरोळ तालुक्यातील अनेक गावात शिवप्रतिष्ठांन च्या वतीने दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात आले आहे