Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

पुस्तक वाचनातून मुले घडली पाहिजेत- प्रांताधिकारी मोसमी चौगुले

शिरोळ प्रतिनिधीः


 मुलांच वाचन,लेखन,मनन व चिंतन सुधारले पाहिजे. शब्दांचे अर्थ कळले पाहिजे.यासाठी पुस्तक वाचनातून मुले घडली पाहिजेत. असे प्रतिपादन इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी केले. त्या शिरोळ मधील कन्या विद्या मंदिर नंबर दोन व राजर्षि शाहू विद्या मंदिर नंबर एक या शाळेत डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन  कार्यक्रमात मार्गदर्शन केले. त्या मुलांमुलींशी गप्पा गोष्टी करत वाचनाचे महत्व विषद केले. प्लॅस्टिकमुक्तीसाठी आपण आपल्यापासून सुरुवात करावी. सभोवतालच्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्याविषयी उद्बोधन केले.टी.व्ही.न पाहणाऱ्या व चहा न पिणाऱ्या मुलांमुलींचे कौतुक केले.वाचन प्रवृती वाढावी यासाठी ५० पुस्तके त्यांनी शाळेस भेट दिली.त्यांच्या शुभहस्ते वृत्तपत्र विक्रेते धनंजय सावंत यांचा सत्कार करण्यात आला.विशेष म्हणजे शाळा सुटण्याच्या वेळी स्वतः प्रांताधिकाऱ्यांनी घंटा वाजविली.


  याप्रसंगी शिरोळचे तहसिलदार अनिलकुमार हेळकर,गट विकास अधिकारी शंकर कवितके,गटशिक्षणाधिकारी भारती कोळी,केंद्रप्रमुख अण्णा मुंडे,मुख्याध्यापक नूरमहंमद मुल्ला,शिक्षकवृंद,विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलवडे यांनी केले व आभार बाळासो कोळी यांनी मानले.