कै.चनगोंडा क. पाटील हनुमान सह. दुध व्यवसायिक संस्था मर्यादित दत्तवाड संस्थेचा उच्चांकी फरक बिल व भेटवस्तू वाटप कार्यक्रमात
दत्तवाड --गेली 57 वर्षांमध्ये संस्थेने सभासदांचे हित जोपासले असून अनेक कठीण प्रसंगातून संस्थेने कारभार केला आहे. महापूर कोरोना काळात सभासदांना मदत करण्यास संस्था अग्रेसर राहिली आहे. पुढेही सभासदांनी संस्थावर विश्वास ठेवून संस्थेत दुधाचा पुरवठा करावा संस्था सभासदांच्या पाठीशी आहे असे उद् गार राजगोंडा पाटील यांनी काढले ते कै.चनगोंडा क. पाटील हनुमान सह. दुध व्यवसायिक संस्था मर्यादित दत्तवाड संस्थेचा उच्चांकी फरक बिल व भेटवस्तू वाटप कार्यक्रमात बोलत होते
यावर्षी संस्थेने म्हैस दुधास 9 % व गाय दुधास 5 % ने फरक वाटप. एकूण 3,30,000 ₹ रुपये चे फरक बिल व24,000 रुपयांचे चटई भेटवस्तू वाटप चेअरमन व संचालकांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी. चेअरमन आण्णासो चनगोंडा पाटील व्हा .चेअरमन बाळासो पाटील ,संचालक बंडू सिद्धू चौगुले ,प्रकाश पाटील ,बादशाह मुल्ला, सिद्धगोंडा पाटील, दौलत माने ,अशोक पाटील, शकुंतला पाटील, सचिव महादेव मटाले सागर झुनके ,शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.