*तब्बल 40 वर्षांनी भेटले शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी, एकत्र येऊन स्नेमेळावा मोठ्या उत्साहात साजरा*
*तब्बल 40 वर्षांनी भेटले शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी, एकत्र येऊन स्नेमेळावा मोठ्या उत्साहात साजरा*
दत्तवाड ता. शिरोळ श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कुल येथे 1983/84 या वर्षातील दहावी विद्यार्थी, विद्यार्थिनी तब्बल 40 वर्षांनी एकत्र येऊन स्नेह मेळावा संपन्न केला. नोकरी, उद्योग, संसार, हे सारे बाजूला ठेवून सर्वजण मेळाव्यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. वयाचे भान न ठेवता सर्वांनी धमाल केली.
एकूण 86 विद्यार्थी, विद्यार्थिनी एकत्र शाळेमध्ये शिकत होते. पूर्वी रस्त्यात गुडघ्या एवढे खड्डे, खड्ड्यात पावसाचे पाणी, ऊन,वारा याला ना जुमानता पायी अनवाणी चालत जाऊन अशा कठीण परिस्थितीत त्यांनी आपली शाळा पूर्ण केली.
सर्वांनी एकत्र आल्यावर त्यांच्या आनंदाला पारा राहिलेला नव्हता. आनंदाचे अश्रू काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून येत होते.पूर्वीचे दिवस त्यांना पुन्हा जागृत केले.
गावातून फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमला शिक्षक श्री जाधव, कदम, सुरवशी, जुगळे, सिदनाळे, पंडित ठोमके, ए. बी. पाटील या गुरुजीचां सत्कार करण्यात आला शाळेमधील अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी आज चांगल्या पदावर काम करत आहेत. याचा मला असा सार्थ अभिमान आहे.असे विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या तोंडी होते.
या कार्यक्रमाच्या शेवटी सैराट गाण्यावरती सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी आपले वय विसरून मनसोक्त डान्स केला.
या कार्यक्रम चे नियोजन संजय माने, संजय तावदारे, राम कलगी, सुरेश तिप्पानावर, सुलोचना किलकर यांनी केले.