शिरोळ कबूतर उडाऊ स्पर्धेत विष्णू देशमुख यांचे कबूतर पथक अजिंक्य.
शिरोळ : प्रतिनिधी : शिरोळ कबूतर मित्र मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या जनरल कबूतर उडाऊ स्पर्धेत नेहरूनगर (तासगाव) मधील विष्णू आण्णा देशमुख यांच्या कबूतर पथकाने प्रथम क्रमांक मिळवत1 लाख रुपये रोख रक्कम चांदीची गदा व कायम चषक व निशान असे पारितोषिक पटकावले.
शिरोळ कबूतर मित्र मंडळाचे संस्थापक व युवानेते शाहुल कोळी त्यांच्या संकल्पनेतून शिरोळ येथे जनरल कबूतर उडाऊ स्पर्धा उत्साहात पार पडली.या स्पर्धेत सुमारे 110 कबूतर पथकाने सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने झालेल्या या स्पर्धेत नेहरूनगरच्या विष्णू आण्णा देशमुख यांच्या कबूतर पथकाने प्रथम क्रमांक मिळवत1 लाख रुपये रोख रक्कम चांदीची गदा व कायम चषक व निशान पटकाविले.द्वितीय क्रमांक रफिक नदाफ (रामानंदनगर किर्लोस्करवाडी) यांच्या कबूतर पथकाने मिळवत 50 हजार रुपये रोख रक्कम व कायम चषक पटकावले.तृतीय क्रमांक अण्णा प्रेमी( हुपरी ) यांच्या कबूतर पथकाने मिळवत 25 हजार रुपये रोख रक्कम व कायम चषक पटकाविला.चतुर्थ क्रमांक विशाल चव्हाण (सांगली) यांच्या कबूतर पथकाने मिळवून 15 हजार रुपये रोख रक्कम व कायम चषक बक्षीस मिळवले.पाचवा क्रमांक रहमान शेख (मिरज) यांच्या कबुतर पथकाने मिळवत 1 कबूतर व 10 हजार रुपये कायम चषक असे पारितोषिक मिळवले.
शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,माजी उपसरपंच बाळासाहेब शेख, पत्रकार चंद्रकांत भाट,सुनील कुरुंदवाडे,गणेश मालक,जमीर भाई,वसिम मुल्ला,सागर ज्वेलर्स जयसिंगपूर,मौला मुजावर, शाहिद मुजावर ( इचलकरंजी), महेश माने,शिवराज सूर्यवंशी, आमिर शेख,गजानन पाटील, सर्जेराव कांबळे,सूर्यकांत उर्फ राजू कोळी,शंकर कोळी (नागाव),पिंटू शेख,अलताफ मुल्ला,नामदेव हेरवाडे,अनिकेत आवळे,दिगंबर माळी,गणेश भोई,मोहन शिकलगार,जमीर कुरणे,मोहसीन कुन्नूरे,रणजीत पाटील,किसन चौगुले,असिफ बागवान,अली मुल्ला यांच्या उपस्थितीत स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.स्वागत व प्रास्ताविक वासिम मुजावर यांनी केले दिलीप धोत्रे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कबूतर उडाऊ स्पर्धेत आष्टा मित्र मंडळ,नितीन पांढरे,सुरेश कोळी,निशिकांत कोळी,स्वप्निल कोळी,युवराज कोळी,वाहिद शेख,सोन्या कोळी,ज्ञानेश्वर सावंत,मोन्या कोळी,जय भवानी गोविंदा पथक शिरोळ, कोळी गल्ली शिरोळ,सांगली कबूतर मित्र मंडळाचे यल्लाप्पा मामा मातृभूमी कबूतर मंडळ व एस एम परिवार यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले.