घोसवाड हायस्कूलचा सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के निकाल
घोसरवाड येथील सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित घोसरवाड हायस्कूल घोसरवाड या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून गेली पाच वर्ष सलग शंभर टक्के निकाल लागण्याची परंपरा यावर्षीही कायम राहिली आहे.
सुरज शिर्के प्रथम, तनुजा पुजारी द्वितीय, तर पूजा खोत यांनी तृतीय क्रमांक पटकावला असून यांना मुख्याध्यापक बी एन शिंदे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असून संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र भांगे सचिव विजित शिंदे सरकार यांच्यासह सर्व सदस्यांचे प्रोत्साहन लाभले आहे. या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.