घोसरवाड येथील हालसिद्धनाथ देवाच्या घोड्याचे निधन
घोसरवाड तालुका शिरोळ येथील सुप्रसिद्ध असणाऱ्या हालसिद्धनाथ देवस्थानच्या घोड्याचे *श्री हरी* अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. घोसरवाडसह परिसरातील भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळ आहे.
सहा वर्षांपूर्वी हा पांढराशुभ्र घोडा देवस्थानकडे आणण्यातआला होता. त्यापासून तो आबाल वृद्धांचा भक्तांचा लाडका बनला होता. पांढरा शुभ्र व देखना असलेल्या या घोड्याने अनेक धार्मिक कार्यक्रमातून दसरा दिवाळी यात्रा पालखी सोहळ्यात तो सहभागी होत होता. घोसरवाड सह परिसरातील भक्तांचा अल्पावधीत लाडका बनलेला घोडा गेली सहा दिवस पोटाच्या विकाराने आजारी होता त्याच्यावर औषध उपचार सुरू होते त्यातच त्याचे रविवारी रात्री दहा वाजता निधन झाले. मध्यरात्री ट्रॅक्टर ट्रॉली सजवून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे घोसरवाड सह परिसरातील भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.