महावीर नगर येथे गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
दत्तवाड
येथील महावीर नगर येथे गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामपंचायत सातत्याने याकडे दुर्लक्ष करीत आहे.
दतवाड तालुका शिरोळ येथील महावीर नगर येथे गटारीच्या कामासाठी गेली दहा वर्षे नागरिक सातत्याने ग्रामपंचायतीकडे मागणी करत आहेत मात्र ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असून गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने त्यातूनच मार्ग काढत चालत आहेत यामुळे वाहनधारकांना व चालत जाणाऱ्यांना गटाच्या पाण्यातूनच जावे लागत आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या पाण्यातूनच लहान मुले महिला वृद्ध नागरिक जात असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
दत्तवाड यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली असून ग्रामपंचायतीने सदर गटर ताबडतोब दुरुस्त करून रस्त्यावर येणारे पाणी बंद करावे अशी मागणी नागरिकातून होत आहे.