स्वर्गीय बंडा अप्पा माने ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित दतवाड ची वार्षिक सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली
दत्तवाड - येथील. स्वर्गीय बंडा अप्पा माने ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित दतवाड ची वार्षिक सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली अध्यक्षस्थानी देवेंद्र जब्बू उपाध्ये होते.
संस्थेचे चेअरमन सुरेश पाटील यांनी संस्थेची माहिती दिली यात चालू आर्थिक वर्षात 28 कोटी 90 लाख रुपये ची उलाढाल झाली असून एकूण पाच कोटी 63 लाख ठेवी असून कर्ज चार कोटी 25 लाख वितरित करण्यात आली आहे.
प्रथम प्रास्ताविक शिवाजी जाधव यांनी केले. स्वागत जितेंद्र काटकर अहवाल वाचन रमेश शिरगावे यांनी केले. यावेळी व्हाईस चेअरमन त्रिशला प्रभू चौगुले, संचालक बाबुराव पवार, राजगोंडा पाटील ,रावसो पाटील, शब्बीर नायकवड ,जयपाल सिदनाळे दौलत माने,शिवाजी जाधव चंद्रकांत कांबळे ,संजय रेळेकर, दौलत माने,कुसुम कलगी, क्लार्क अमोल पाटील, यांच्यासह सभासद हजर होते.