नेजे हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन संपन्न.
नेजे हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन संपन्न.
दत्तवाड:प्रतिनिधी : श्रीमती आक्काताई नाना नेजे हायस्कूल दत्तवाड येथे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.
प्रारंभी पर्यवेक्षक एस.बी.मलकाने यांचे हस्ते कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.स्वागत व प्रास्ताविक डॉ.कु.एस.ए.पाटील यांनी केले.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या व्यक्तीरेखा,भाषणे,गौरवगीत, स्वगत सादर केले.यामध्ये कु.अनुष्का पाटील,संध्या पाटील,प्रिती माळगे,तन्वी कांबळे,युवराज कांबळे,सार्थक धुमाळे या मुलांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक संजय तावदारे म्हणाले की मराठी भाषेचे जतन करुन तिचा गौरव वाढविला पाहिजे.मराठी भाषा टिकविण्यासाठी आपण आपले सर्व व्यवहार मराठी भाषेतूनच करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
याप्रसंगी सौ.सुजाता पाटील, विजया काळे,के.के.बिरनाळे, पी.एस.खंजिरे यांच्यासह विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.आर.एम. पाटील यांनी आभार मानले.
