Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

जयसिंगपूर शिरोळ शहराप्रमाणे कुरुंदवाडचाही विकास साधू : आमदार यड्रावकर

 


जयसिंगपूर शिरोळ शहराप्रमाणे कुरुंदवाडचाही विकास साधू : आमदार यड्रावकर 

कुरुंदवाड : मिलिंद देशपांडे 

संस्थानकालीन नगरपालिका असलेल्या कुरुंदवाड शहराचा म्हणावा तितका विकास झालेला नाही. लगत असलेल्या शिरोळ आणि जयसिंगपूर नगरपालिकांचा विकास आणि कुरुंदवाड नगरपालिका विकास यात मोठा फरक आहे. गटातटाच्या राजकारणामुळे शहराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून जयसिंगपूर आणि शिरोळ प्रमाणे कुरुंदवाड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जनतेने शाहू आघाडीला संधी दिल्यास कुरुंदवाड शहराचा कायापालट करू, असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला. 

कुरुंदवाड येथील मतदारांच्या गाठीभेटी प्रसंगी ते बोलत होते. 

गेल्या ४० ते ५०  वर्षापासून कुरुंदवाड नगरपालिकेत गटातटाचे राजकारण सुरू असल्याने शहराचा विकास झालेला नाही. अनेक वेळा विकास कामांना निधी उपलब्ध करून देऊन सुद्धा नगरपालिकेतून ठराव मिळाले नाहीत ही खेदजनक बाब आहे. रखडलेली पाणीपुरवठा योजना युडीआरएफ च्या निधीतून येत्या वर्षभरात आम्ही पूर्ण करणार आहोत. शहरातील नागरिकांचे आरोग्य तसेच रस्त्यांची रुंदी वाढावी यासाठी भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि सभोवतालचे सौंदर्य साकारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व सुशोभीकरणाचे काम देखील सुरू आहे. शहरातील सर्वच समाजाला सांस्कृतिक भवन उपलब्ध करून दिले आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन आम्ही कार्य केले आहे. त्यामुळे यापुढे देखील हा विकास अखंडित सुरू ठेवण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार नगरपालिकेमध्ये जाणे गरजेचे आहे. त्यासाठी मतदारांनी शाहू विकास आघाडीला एक संधी देऊन पहावी निश्चितच कुरुंदवाड शहराचे रुपडे पालटल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा ठाम विश्वास आमदार यड्रावकर यांनी दिला. 

या प्रसंगी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा डांगे म्हणाल्या, कुरुंदवाड शहराचा विकास हा आमचा मुख्य ध्यास आहे. अनेक वर्षे विकासाची कामे रखडल्याने नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. राजर्षी शाहू विकास आघाडीने सर्वसमावेशक धोरण ठेवून शहराच्या प्रत्येक प्रभागासाठी काम करण्याचा संकल्प केला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, भुयारी गटार यांसारखी आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील. महिलांसाठी सुरक्षित वातावरण, युवकांसाठी संधी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील राहू. कुरुंदवाड शहराला आधुनिक, स्वच्छ आणि प्रगत बनवण्याचा आमचा संकल्प आहे. जनतेने आम्हाला एक संधी दिली तर शहराचा कायापालट नक्कीच होईल असे सांगितले.

  यावेळी रामचंद्र डांगे, दयानंद मालवेकर,  मिरु बागवान, अल्लाफ बागवान, किरण मालगावे, विजय मालवेकर, शिवतेज महाडिक, बापूसो कुंभार, श्रीकांत माळी, अमर  कुंभार, सत्यजित बिडकर, अरुण म्हतापे, चाँद कुरणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.