Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

उर्दू दत्तवाड ची संस्कृतीक व क्रीडा स्पर्धेत उत्तुंग भरारी ............केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिप चा मानकरी

 


उर्दू दत्तवाड ची संस्कृतीक व क्रीडा स्पर्धेत उत्तुंग भरारी

............केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिप चा मानकरी

दत्तवाड  -मिलींद देशपांडे                                             केंद्र उर्दू कुरुंदवाड अंतर्गत केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा केंद्र शाळा उर्दू कुरुंदवाड येथे व क्रीडा स्पर्धा अँग्लो उर्दू हायस्कूल औरवाड येथे नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये उर्दू विद्या मंदिर दत्तवाडच्या विद्यार्थ्यांनी  संस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. विविध कलात्मक सादरीकरणे, गीत–नृत्य, कथाकथन, नाट्यकरण तसेच उंच उडी, लांब उडी, थाळीफेक, धावणे, खो-खो, कबड्डी अशा क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी तब्बल २० पारितोषिके मिळवून उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा लौकिक उंचावला.

             विद्यार्थ्यांच्या या यशामागे कष्ट, शिस्त आणि संघभावना यांची महत्त्वपूर्ण भूमिका असून, मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी दिलेल्या प्रशिक्षणाचे, परिश्रमाचे आणि प्रेरणेचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. या स्पर्धेत मुला, मुलींनी दाखवलेल्या आत्मविश्वासाला आणि प्रतिभेला उपस्थित मान्यवरांनीही दाद दिली. 

     या यशामध्ये मुख्याध्यापिका नसरीन पटेल, क्रीडा शिक्षक अंजरशा पटेल, निसार पटेल, रिजवाना पटेल यांनी प्रशिक्षण देत कष्ट घेतले व केंद्रप्रमुख रियाज चौगले यांचे मार्गदर्शन लाभले.

उर्दू विद्यामंदिर दत्तवाडचे केंद्रस्तरीय स्पर्धेतील कामगिरी

 सांस्कृतिक स्पर्धा

मोठा गट  समूह गीत  केंद्रात प्रथम,

मोठा गट नाट्यकरण मध्ये केंद्रात द्वितीय,

लहान गट  समूहगीत मध्ये केंद्रात  द्वितीय,

लहान गट  नाट्यकरण मध्ये केंद्रात द्वितीय,

लहान गट  कथाकथन मध्ये केंद्रात द्वितीय कु. अमरीन इमरान नदाफ .

.... क्रीडा स्पर्धा 

मोठा गट मुले

धावणे १०० मी प्रथम (तमीम फिरोज डफेदार )

धावणे २०० मी प्रथम (तमीम फिरोज डफेदार )

लांब उडी प्रथम

(तमीम फिरोज डफेदार )

उंच उडी प्रथम 

(अनस शाहनवाज अपराध)

गोळा फेक प्रथम

(तमीम फिरोज डफेदार )

थाळी फेक प्रथम 

(मोहम्मद कैफ शकील डफेदार)

मोठा गट मुली 

उंच उडी प्रथम

(खदीजा फिरोज डफेदार)लांब उडी द्वितीय 

(खदीजा फिरोज डफेदार)

....सांघिक स्पर्धा 

लहान गट मुली 

खो- खो द्वितीय क्रमांक

कबड्डी तृतीय क्रमांक 

लहान गट मुले

धावणे ५० मी प्रथम 

(युसुफ हिदायतुल्लाह नदाफ )

धावणे १०० मी प्रथम (युसुफ हिदायतुल्लाह नदाफ )

लांब उडी प्रथम (युसुफ हिदायतुल्लाह नदाफ)

मोठा गट मुले रिले प्रथम,  मोठा गट मुली खो खो तृतीय 

         प्रथम क्रमांक पटकावणारे विद्यार्थी तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये केंद्राचे नेतृत्व करण्यासाठी पात्र ठरले आहेत.