Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

38 वर्षानंतर भेटणार वर्गमित्र मोहनलाल दोशी विद्यालयातील

 


38 वर्षानंतर भेटणार वर्गमित्र

दत्तवाड -अर्जुन नगर येथील मोहनलाल दोशी विद्यालय  येथे 1987 यावर्षी दहावी वर्गात शिकणारे वर्गमित्रांचा स्नेह मेळावा रविवार 21 डिसेंबर रोजी पार पडत असुन 38 वर्षानंतर हे वर्गमित्र एकमेकांना भेटणार आहेत. 

     या स्नेह मेळाव्याची तयारी गेली सहा महिने सुरू असून सर्वांना संपर्क करून या मेळाव्याची तयारी करण्यात आली आहे. 

सकाळी साडेनऊ ते दहा या वेळेत मेळावा सुरू होणार  यात शिक्षकांचा सत्कार विद्यार्थ्यांचा परिचय मनोगत स्नेहभोजन व सर्वांना स्मृतिचिन्ह वाटप असा कार्यक्रम होणार आहे. 

पुणे बेंगलोर अमेरिका मुंबई येथून या स्नेह मेळाव्यासाठी वर्गमित्र येणार आहेत.