दत्तवाड --घोसरवाड ता शिरोळ येथे देवराज बाबा युथ फाउंडेशन (घोसरवाड), अलायन्स हॉस्पिटल (इचलकरंजी) आणि शरद मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटर (यड्राव) यांच्या संयुक्त विद्यमाने 'महाआरोग्य शिबिर' आणि आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या शिबिराचे शानदार उद्घाटन शिरोळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी. विजीतसिंह शिंदे, . बाबासो पुजारी देवराज शिंदे प्रमुख उपस्थित होते.
ग्रामीण भागातील जनतेला एकाच छताखाली सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या उद्देशाने आयोजित या शिबिरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिबिरांमध्ये १९६ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले.
'क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा'अंतर्गत ११४ लाभार्थ्यांचे मोफत एक्स रे काढण्यात आले.७७ रुग्णांची मोफत ईसीजी तपासणी करण्यात आली.
४१ रुग्णांची मोफत रक्ताची तपासणी करण्यात आली.
आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शिबिरामध्ये विशेष योगासने सत्राचे आयोजन करण्यात आले होते. योग शिक्षक श्रीमती अनुसया सावंत यांनी उपस्थित सर्वांना योगाचे महत्त्व पटवून देत त्यांनी शिबिराच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांकडून विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्र (घोसरवाड) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषणकुमार दादासो यमाटे, डॉ. सॅम्युअल चोपडे, आरोग्य सेविका आयेशा मुल्ला, रुबाब पटेल, श्रीमती बागल, प्रथमेश सावंत, सर्व आशा स्वयंसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच तालुका क्षयरोग अधिकारी व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा परिषद सदस्या उत्तराताई विजितसिंह शिंदे यांनी आभार मानले. शिबिरासाठी नागरिक रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घोसरवाड येथे आरोग्य शिबिर संपन्न
Reviewed by JD NEWS
on
June 13, 2026
Rating: 5
Reviewed by JD NEWS
on
June 13, 2026
Rating: 5
