नदीतील मासे थंडीने मेले अधिकारांचा जावई शोध
जेडी न्यूज नेटवर्क दत्तवाड मंदा देशपांडे कृष्णा नदीतील मासे प्रदूषणाने नव्हे तर थंडीने मेले असा नवा जावाई शोध लावणाऱ्या सांगली प्रदूषण मंडळाचे अधिकारी समाधान आवताडे यांचा आज आंदोलन अंकुश चा फेटा बांधून सत्कार केला. नदी प्रदूषित होण्यास जबाबदार घटकांना वाचवण्यासाठी त्यांनी हे विधान केले होते म्हणून याचा जाब त्यांना विचारला असता व मासे मेले आहेत हे सांगणारा शव विच्छेदन अहवाल द्या असे म्हंटल्यानंतर त्यांनी मी थंडीने मासे मेले आहेत असं म्हंटलोच नाही म्हणून हात वर केला.
नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करा अन्यथा वेगळा सत्कार करू असा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी दिला
यावेळी आमचे सांगलीचे कृष्णा पूर नियंत्रण समिती सद्दश सर्जेराव पाटील संजय कोरे आंदोलन अंकुश चे दिपक पाटील, भूषण गंगावणे, संभाजी शिंदे, भोसले सर, आनंद भातमारे, सचिन सगरे, अमर माने, रियाज मुल्ला उपस्थित होते.