Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

खिद्रापूर पोस्ट ऑफिस ची जागा बदलणार, पाखरे यांचे उपोषण मागे

 अखेर खिद्रापूर येथील पोस्ट ऑफिस अन्यत्र हलविण्याचा निर्णय कोल्हापूरचे डाक प्रवर अधीक्षक श्रीयुक्त इंगळे यांनी घेेेऊन आमरण उपोषण करण्या पासून परावृत्त केले.  सविस्तर वृत्त असे की,  खिद्रापूर येथील डाकपाल टाटाजी कागवाडे यांना बडतर्फ करावे, या मागणीसाठी गणेश पाखरे हे  कोल्हापूर येथील मुख्य पोस्ट ऑफिस समोर बेमुदत आमरण उपोषणास बसले होते.  त्यांनी दि.22 फेब्रुवारी 2023 पासून उपोषनास बसले होते. 


कोल्हापूर विभागाचे डाक प्रवर अधीक्षक श्रीयुक्त इंगळे यांनी मार्ग काढीत टाटाजी कागवाडे यांचे घरी असलेल्या पोस्ट ऑफिसमुळे त्यांचे कुटुंबातील लोकांची पोस्ट ऑफिसच्या कामकाजात होत असलेली ढवळाढवळ टाळण्यासाठी पोस्ट ऑफिसच ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायतीच्या उपलब्ध 10x10 च्या खोलीत हलविण्याचा निर्णय घेतला. सदरच्या निर्णयाचा मान राखीत तसे लेखी घेऊन गणेश पाखरे यांनी आपले उपोषण स्थगित केले.