राज्य कर्मचारी संघाच्या संपाला महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाचा पाठिंबा- राज्य समन्वयक डॉ .भूषण यमाटे
दत्तवाड--
दत्तवाड- राज्य कर्मचारी संघाच्या संपाला महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाचा पाठिंबा असून 28 मार्च पर्यंत संप मिटला नाही तर संपात सहभागी होणार असल्याची माहिती महासंघाचे राज्य समन्वयक डॉक्टर भूषण यमाटे यांनी दिली तर राज्याध्यक्ष डॉक्टर अरुण कोळी यांनी यासंबंधीचे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिले आहे.
एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी राज्य कर्मचारी संघाच्या विविध संघटना 14 मार्चपासून बेमुदत संपावर आहेत या संपाला महाराष्ट्र राज्य आरोग्य राज्य पत्रिका वैद्यकीय अधिकारी महासंघाचा पाठिंबा असल्याचे पत्र राज्याध्यक्ष कोळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे निवेदनात म्हटले आहे की मागील 23 वर्षापासून वैद्यकीय अधिकारी गट ब पदोन्नती पासून प्रलंबित असून 720 वैद्यकीय अधिकारी गट अ संवर्गाअंतर्गत पदोन्नती देण्यात यावी वैद्यकीय अधिकारी गट ब यांचे अस्थायी सेवा काल्पनिक रित्या सेवा विषय व फेर वेतन निश्चिती करण्याकरता ग्राह्य धरणे द्यावी वैद्यकीय अधिकारी अ व अधिकारी गट व यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात राज्यसेवेतील विविध संघटनामार्फत संप पुकारण्यात आला असून या संपाला महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी महासंघाची अधिकारी गट व संवर्गातील अधिकारी यांचा पाठिंबा आहे तरी आमच्या मागणीचा योग्य विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे.