माजी ऑनरेरी कॅप्टन मा.श्री. रमेश निर्मळे यांचा ५०वा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न*.....
*माजी ऑनरेरी कॅप्टन मा.श्री. रमेश निर्मळे यांचा ५०वा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न*
टाकळीवाडी ता शिरोळ येथील रमेश निर्मळे यांचा ५०वा वाढदिवस आज संपूर्ण आजी-माजी सैनिक व गावकऱ्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
एक अष्टपैलू व्यक्तिमत्व भारत मातेची 28 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाल्यावर सामाजिक कार्याचा वसा घेतलेले एक आदर्श व्यक्तिमत्व यांचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला.
यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा कुमार विद्या मंदिर टाकळीवाडी येथे झाले. १ली ते ७ वी पर्यंत शिक्षण झाले.
त्यानंतर ८वी ते १०वी श्री सरस्वती हायस्कूल शाळा टाकळीवाडी येथे पूर्ण केले व कॉलेज कुरुंदवाड येथे पूर्ण झाले.
३० ऑक्टोंबर १९९१ रोजी भारतीय सेनेत रुजू झाले .सागर मध्यप्रदेश येथे ट्रेनिंग पास करून त्यांनी पहिली पोस्ट जम्मू-काश्मीर येथे केली, त्यानंतर ५ वेळा जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तान बॉर्डर वरती नोकरी केली. तसेच जम्मू-काश्मीर चायना बॉर्डर येथे फर्स्ट गलिसियेर मध्ये सर्विस केली.
परदेशामध्ये भूतान ,साउथ आफ्रिका, सुडान ,येथे शांती सेना म्हणुन नोकरी केली.
राजस्थान ,बेंगलोर, जामनगर ,येथे नोकरी करून शेवटी उत्तराखंड येथून 28 वर्ष सेवा करून ऑनरेरी कॅप्टन पदावरून सेवानिवृत्त झाले.
देश सेवा करून झाल्यावर ते आपल्या टाकळीवाडी गावामध्ये सामाजिक कार्याचा वसा सुद्धा हाती घेतला आहे. कोरोना काळात त्यांनी औषध फवारणी असो किंवा जिल्हा परिषदेमध्ये स्वच्छता मोहीम यामध्ये हे आवर्जून भाग घेऊन संपूर्ण आजी-माजी सैनिक यांच्यावतीने सामाजिक कार्य निभावले होते. विद्यार्थ्यांना वही वाटप असो किंवा एखादे क्रीडा स्पर्धामध्ये किंवा सांस्कृतिक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असतात.
यांनी गावांमध्ये सैनिक फेडरेशन असोसिएशनची स्थापना केली व सर्व आजी-माजी सैनिकांना एकत्र करून माजी सैनिक यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असतात.
गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व हे आता ठरले आहेत. संपूर्ण गावचा विकास हे त्यांचे ध्येय आहे. यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गावातील संपूर्ण नागरिकांनी आपले प्रेम दाखवले आहे.
यावेळी गावातील सर्व आजी-माजी सैनिक ,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य ,शिवगर्जना तरुण मंडळ, गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, सैनिक फेडरेशन चे सर्व तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित.