Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

टारे पेट्रोल पंपाने ग्राहकांची विश्वासार्हता जपली : डी आर पाटील पेट्रोल पंपाच्या वर्धापन दिनी ग्राहकांचा केला सन्मान

शिरोळ : प्रतिनिधी : 


टारे परिवाराने शिरोळ या निमशहरी भागात पेट्रोल पंप सुरू करून ग्रामीण भागातील वाहनांसाठी दर्जेदार आणि उच्च प्रतीचे पेट्रोल डिझेल सीएनजी गॅस उपलब्ध करून २४ तास सेवा देत ग्राहकांची विश्वासार्हता जोपासली आहे असे प्रतिपादन शिरोळ शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील यांनी केले

शिरोळ अर्जुनवाड मार्गावरील टारे पेट्रोल पंपाचा वर्धापन दिन शनिवारी उत्साहात संपन्न झाला यावेळी दिवसभर येणाऱ्या ग्राहकांचे गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले यावेळी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत असताना पत्रकार डी आर पाटील म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून टारे पेट्रोल पंपाच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा देण्याचे काम सुरू असून टारे परिवाराने सुद्धा विविध उद्योगांची निर्मिती करून शिरोळ शहराच्या वैभवात भर घालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे तसेच सीएनजी गॅस वापरणारे वाहन मालक अलताफ मुल्ला (गौरवाड) म्हणाले की ग्रामीण भागात टारे परिवाराने सीएनजी गॅस पंपाची उभारणी करून आम्हाला २४ तास गॅस उपलब्ध करून देऊन वेळेची व पैशाची बचत केली आहे येथील कर्मचारी सुद्धा ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देत आहेत असे सांगितले

टारे फ्युल्सचे संचालक व युवा उद्योजक अविनाश टारे अतुल टारे यांनी उपस्थित ग्राहकांचे स्वागत केले जांभळी ग्रामपंचायतचे सदस्य फिरोज मुजावर रोटरी क्लब शिरोळ चे सेक्रेटरी अमित पंडित जेष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी चंद्रकांत भाट बाळासाहेब कांबळे कुमार कांबळे यांच्यासह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते