जयप्रकाश नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
दत्तवाड
कुरुंदवाड येथील जयप्रकाश नागरी सहकारी पतसंस्थाने 35 वर्षाच्या कालखंडामध्ये सभासद, ग्राहक व हितचिंतकांचा आर्थिक विश्वास संपादन केला असून संस्थेला 2022 ते 20 आर्थिक वर्षांमध्ये 33 लाख 86 हजार रकमेचा ढोबळ नफा प्राप्त झाला असून संस्थेच्या नियमाप्रमाणे सर्व तरतुदी वजा जाता सात लाख 12 हजार इतका नफा झालेला आहे.
संस्थेच्या एकूण ठेवी 27 कोटी 63 लाख इतके आहेत तर कर्ज वाटप 18 कोटी सहा लाख असून संस्थेचा राखीव निधी एक कोटी पंधरा लाख आहे संस्थेची गुंतवणूक 11 कोटी 19 लाख इतकी आहे तर चालू वर्षात 49 कोटी चाळीस लाख इतका उत्साही व्यवसाय झालेला आहे. यावेळी दहा टक्के लाभांश देणारे येणार असल्याची माहिती चेअरमन महादेव माळी यांनी दिली ते येथील अमन हॉलमध्ये झालेल्या पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बोलत होते.
वार्षिक सभेच्या विषय वाचन करत असताना जनरल मॅनेजर बुबनाळे यांनी शहरी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व्यवसायिकांना नोकरदारांना आर्थिक सहाय्याचा हात देण्यासाठी या संस्थेची स्थापना झालेली आहे. देवापुढे जोडलेल्या दोन हातापेक्षा मदतीचा एक हात अधिक पुण्यवान असतो या भावनेतून समाजातील आर्थिक सबल माणसाची पूजी गरजवंतांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमाची भूमिका घेऊन आम्ही सर्वजण कार्य करीत आहोत या कार्यामध्ये सभासदांचा विश्वास हीच आमची ताकद आहे या विश्वासाला पात्र राहून स्वच्छ, पारदर्शक आणि गतिशील सेवा देणे हे आमचे ध्येय आहे संस्थेच्या चार ही संख्या नफ्यामध्ये आहेत असे त्यांनी सांगितले
यावेळी डॉक्टर रामगोंडा पाटील व रावसाहेब माळी यांची तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
महादेव माळी यांनी स्वागत केले तर साताप्पा बागडे यांनी आभार मानले अहवाल वाचन यासीन जमादार यांनी केले यावेळी सर्व संचालक ,चारही शाखेचे सल्लागार सदस्य, सभासद ,ग्राहक व कर्मचारी उपस्थित होते.