शिरोळच्या शेख कुटुंबियांकडून १७ वर्षे वारकर्यांची सेवा : वर्षभरात १६ दिंड्यांची करतात भोजनाची सोय
शिरोळ : प्रतिनिधी :
शिरोळमधील माजी उपसरपंच हाजी बाळासाहेब काशिम शेख व त्यांच्या कुटुंबीयांनी पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकरी दिंडीच्या भोजनाची व्यवस्था करून गेली१७ वर्षे वारकरी सेवा परंपरा जोपासली आहे शेख हे मुस्लिम कुटुंबीय असूनही वारकऱ्यांची सेवा करून त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे
शेख कुटुंब नेहमीच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहे. हाजी बाळासाहेब शेख हे गरजूंना गोरगरिबांना मदत करण्याकरिता सातत्याने पुढाकार घेतात त्यामुळे त्यांच्या दातृत्वाने अनेक सामाजिक उपक्रमास मदत नेहमीच होते सखल मराठा आरक्षण आंदोलनावेळी मराठा समाजातील आंदोलकांना शेख कुटुंबियांनी दोन ट्रक भडंग देऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
हाजी बाळासाहेब शेख यांचे निवासस्थान मिरज-शिरोळ महामार्गाच्या शेजारी आहे. या मार्गावर अनेक पायी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान होत असतात. यावेळी शेख कुटुंबिय फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करतात. गेल्या १७ वर्षाहून अधिक काळापासून हा उपक्रम त्यांचा सुरू आहे. वर्षभरात१६ पायी दिंडीच्या भोजनाची व्यवस्था त्यांच्याकडून होत असते. आज शनिवारी श्रावण मास निमित्त शिरदवाड येथील दिंडीचे स्वागत नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्या इंद्रायणी माने पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर आरती करून भोजनाला सुरूवात करण्यात आली. सर्व वारकरी विठ्ठलाच्या नामामध्ये तल्लीन झाले होते यानंतर उपस्थित सर्व वारकऱ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला
हाजी बाळासाहेब शेख यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी माजी ग्रामपंचायत सदस्य सौ रेश्मा शेख मुलं काशीम उर्फ पिंटू शेख साजिद शेख यांच्यासह सर्व शेख परिवार मनापासून वारकऱ्यांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात शेख कुटुंबियांच्या या कार्याने समाजासमोर आदर्श निर्माण केल्या असल्याच्या भावना वारकरी संप्रदायातून व्यक्त होत होत्या