लोकशाही बळकटीसाठी नव मतदार नोंदणी आवश्यक : डॉ अरविंद माने भाजयुमोच्यावतीने शिरोळात नव मतदार नोंदणी अभियान
शिरोळ : प्रतिनिधी :
भारतीय संविधानामध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला मतदानाचा पवित्र हक्क दिला आहे यामुळे प्रत्येक नव मतदाराने आपले मतदान यादीमध्ये नाव नोंदणी करून आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व शिरोळचे नगरसेवक डॉ अरविंद माने यांनी केले
भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर पूर्व आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने शिरोळात नव मतदार नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे याप्रसंगी नगरसेवक डॉ अरविंद माने हे बोलत होते येथील बसवेश्वर चौक येथे नव मतदार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे यावेळी अनेक नव मतदारांनी नाव नोंदणीसाठी अर्ज भरला
या समारंभास मेजर प्रा काशिनाथ भोसले, शिरोळ शहर भाजपा अध्यक्ष संभाजी भोसले, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दिनकर माने, सचिन शिंदे, प्रकाश माने, प्रथमेश शिंदे, शिवराज बनने, सचिन शिंदे शिवराज सुतार, सोहेल शेख, प्रमोद भोसले, दादासो आवळे, सागर काळे ,प्रभाकर स्वामी ,भाग्योदय ढवळे, निखिल माने, विकास माने ,रोहन माने, दगडू जाधव, प्रसन्न कुंभार, सुजित कुंभार, मिरासाहेब मुजावर राहुल माने यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नव मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते