आंदोलन अंकुशच्या दीपक पाटील यांच्या घरावर हल्ला
सैनिक टाकळी-- आंदोलन अंकुश च्या मागे शेतकरी एकजूट होत आहे हे काल शिरोळ तालुक्यातील साखर कारखान्यांनी रॅली च्या माध्यमातून पाहिले आणि हा एल्गार पुढे गेला तर आपली धडगत नाही हे ओळखून त्यांनी बुधवारी रात्री आंदोलन अंकुश च्या दीपक पाटील यांच्या घरावर 70 ते 80 गुंड कामगार यांच्या कडून हल्ला घडवून आणला.
पण सामान्य शेतकरी आंदोलन अंकुश ला साथ देत आहे तसंच टाकळी 1000 ते 1200 तरुण दीपक पाटील यांच्या बाजूने उभे राहिल्याने या कारखानदारांच्या गुंडाना तेथून पळ काढावा लागला. झालेला हल्ला हा दीपक पाटील याच्यावर नसून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्ठावर, त्यांच्या स्वप्नावर झाला आहे व आपला ऊस फुकटात न्यायच्या इराद्याने हा हल्ला केला आहे याची जाणीव झाल्याने संपूर्ण टाकळी गाव या कट रचनाऱ्या कारखानदारांचा निषेध करण्यासाठी एकत्र आले या हल्याचा निषेध व तोडी घ्यायच्या नाहीत दोन दिवसात गावासभा होऊन कारखान्याची ऊस वाहतूक गावातून होऊ द्यायची नाही असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
संघटनेने रात्री उशिरा गुरुदत्त चे मालक एम डी आणि हल्लेखोर यांच्यावर कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली आहे.पण महत्वाचे म्हणजे आंदोलन अंकुश ला टार्गेट करून ही प्रामाणिक चळवळ मोडून काढण्याचा प्रयत्न सर्व पातळीवर सुरु आहे
काल कुरुंदवाड पोलिसांनी पण गुन्हा घेणार नाही म्हणून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला पण आंदोलन अंकुश तो मोडून काढून शेवटी गुन्हा नोंद करायला भाग पाडले .
आमचा लढा हा आता व्यापक होत आहे आणि त्याला शेतकऱ्यांची साथ आहे कारखानदार कितीही जुलूम करू देत आम्ही मागील 500 आणि चालूला 3500 दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असे आंदोलन अंकुशच्या धनाजी चुडमुगे यांनी सांगितले.