दत्तवाड म गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष के एन पाटील होणार?
दत्तवाड म गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष के एन पाटील होणार ?
दत्तवाड -येथील तंटामुक्त अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्याने नुकताच राजीनामा दिला असून आता नवीन अध्यक्ष निवडण्यात येणार आहे यात सामाजिक कार्यकर्ते के एन पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
के एम पाटील सामाजिक राजकीय धार्मिक कार्यात अग्रेसर जेष्ठ नागरिक असून ते समतोल विचार करून गावातील न्याय निवडला योग्य न्याय देतील असा विश्वास गावातील जनतेला असल्यामुळे त्यांची दतवाड महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करावी अशी मागणी यापूर्वी झाली होती डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यासाठी गाव सभा होण्याची शक्यता असून या गाव सभेमध्ये के एन पाटील यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवड बिनविरोध व्हावी अशी मागणी होत असल्याने त्यांची निवड होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे