Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

*कुरुंदवाडच्या फडणीस प्राथमिक शाळेत सलग ३३ वर्षे दिंडी सोहळ्याचे आयोजन*



 *कुरुंदवाडच्या फडणीस प्राथमिक शाळेत सलग ३३ वर्षे  दिंडी सोहळ्याचे आयोजन*

कुरुंदवाड (प्रतिनिधी):--- खांद्यावर भगव्या पताका..... टाळ मृदुंगाचा गजर...... ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषांनी अवघी कुरुंदवाड नगरी दुमदुमली .....

       येथील शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडच्या कै. डॅा.रामचंद्र विठ्ठल फडणीस व कै. सौ. जानकीबाई रामचंद्र फडणीस  प्राथमिक विद्या मंदिर कुरुंदवाड (ता.शिरोळ) *" आषाढी एकादशी निमित्त , संतरूप दर्शन दिंडी सोहळा "*  मोठ्या उत्साहात  संपन्न झाला.

           संत वारकऱ्यांच्या वेशभूषेत सर्व बालचमू या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पंढरीची मांदीयाळी कुरुंदवाड नगरीत अवतरली होती, असे सर्व नागरिकांना वाटत होते.या कार्यक्रमाला कुरुंदवाड येथील विठ्ठल मंदिराचे ट्रस्टी राजेंद्र गोपाळ घारे व वंदना राजेंद्र घारे हे उभयता उपस्थित होते. तसेच संस्थेच्या माजी जेष्ठ संचालिका अंजलीताई कुलकर्णी उपस्थित राहून दिंडी सोहळा यासाठी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

   ही दिंडी रामचंद्र रोड,काळाराम मंदिर, बाजारपेठ  मार्गे विठ्ठल मंदिर या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचली  ठिकठिकाणी मुख्य चौका- चौकात विठ्ठलाचे गीत बालचमूंनी सादर केले. त्याला विठ्ठल भक्तांनी तोंड भरून कौतुक केले विठ्ठल मंदिर या ठिकाणी पालखी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी आरती , झिम्मा-फुगडी अशा खेळात वारकरी, विद्यार्थी भक्तीरसात चिंब भिजून गेले. त्यानंतर प्रसाद वाटप करून पुनश्च दिंडी शाळेकडे  प्रस्थान झाली. गावातील बहुसंख्य पालक , वारकरी , भक्त मंडळी या दिंडीत सहभागी झाले होते. 

      कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मा.प्रा.श्री.शरदचंद्र पराडकर व संस्थेच्या सेक्रेटरी मा.सौ.सीमा जमदग्नी मॅडम यांची प्रेरणा व स्फूर्ती मिळाली . 

         प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका नलिनी काळे,  सौ.कांचनमाला बाबर , विद्यासागर उळागड्डे. अनिल पांडव , अनिता भोई , मिरामा बाणदार , सुनिल पवार , रेखा औरवाडे , श्रीमती मालूताई गुरव , श्रीमती सुनिता स्वामी  ,एस.पी. हायस्कूलचे माजी पर्यवेक्षिका पी.एच.कुलकर्णी मॅडम  यांच्याकडून बुंदीचे लाडू तर योगेश व्होरा , ओंकार पाटुकले या पालकांच्या कडून राजगिऱ्याचे लाडू प्रसाद वाटण्यात आले या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने पालक उपस्थित होते.दत्तात्रय कुरुंदवाडे यांनी सूत्रसंचालन केले.