Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

 


दत्तवाड -

येथील पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र घोसरवाड येथील आरोग्य सेवक विष्णु पोतदार, रमेश राजमाने, फरनाज सनदी, यांनी इयत्ता पहिली ते चौथी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी ची आरोग्य तपासणी करण्यात आली.  या आरोग्य तपासणीत नाक ,कान ,घसा ,डोळे यांची तपासणी करण्यात आली तर विद्यार्थ्यांनी दात स्वच्छ ठेवावेत हात धुवावेत नखे व केस वेळचे वेळी कापावेत याची माहिती देऊन आरोग्याची काळजी घेण्याबद्दल माहिती देण्यात आली यावेळी मुख्याध्यापक अभिजीत मालगावे, यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते