Home
/
Unlabelled
/
दत्तवाड येथे बौद्ध विहार इमारतीच्या स्लॅबचे शुभारंभ अजय पाटील यांच्या हस्ते संपन्न
दत्तवाड येथे बौद्ध विहार इमारतीच्या स्लॅबचे शुभारंभ अजय पाटील यांच्या हस्ते संपन्न
दत्तवाड : प्रतिनीधी.
दत्तवाड ता. शिरोळ येथील बौद्ध वसाहतीमध्ये बांधण्यात आलेल्या बौद्ध विहार सांस्कृतिक हॉलचे नूतन इमारती च्या पहिल्या टप्प्याचे स्लॅबचे शुभारंभ यड्राव बँकेचे चेअरमन . अजय पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला.
बौद्ध विहार सांस्कृतिक हॉल इमारात मंजुरी मिळाली असताना यासाठी . डॉ. राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्या प्रयत्नातून या इमारतीस 50 लाख रुपये निधी प्राप्त झाल्याने हि बौद्ध विहार नूतन इमारत लवकरात लवकर पूर्णत्वास होईल येथील बौद्ध समाजातील सर्व मुलांच्यासाठी विविध कार्यक्रमाद्वारे या मुलांना चांगले सुसंस्कार मिळतील असे या वेळी मनोगतातून अजय पाटील यांनी म्हणाले.
यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे, उपसरपंच संजय पाटील , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते धन्यकुमार सिदनाळे, दत्तवाड ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण , नुर काले, प्रकाश चौगुले, प्रभू चौगुले, अकबर काले, अनिता कडाके, काशीबाई केंगारे , तेजस वराळे, प्रल्हाद कांबळे व समुद्र कांबळे आदी मान्यवरांच्यासह ग्रामस्थ बंधू भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्तवाड येथे बौद्ध विहार इमारतीच्या स्लॅबचे शुभारंभ अजय पाटील यांच्या हस्ते संपन्न
Reviewed by JD NEWS
on
August 31, 2024
Rating: 5
Reviewed by JD NEWS
on
August 31, 2024
Rating: 5
