पृथ्वीराज खरपी याचा प्रामाणिकपणा
दत्तवाड - कलियुगातही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे दर्शन दतवाड येथील पृथ्वीराज खरपी यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले.
पृथ्वीराज खरपी हा येथील एकनाथ चव्हाण यांच्या कृष्णाई ढाबा येथे कामगार म्हणून काम करतो शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी रात्री जेवणासाठी दानवाड येथील गांधी भुपाल कांबळे आले होते त्यावेळी त्यांचे आठ हजार चारशे रुपये तेथे पडले पृथ्वीराज यांनी ते पाहिले व पैसे कोणाचेच पडलेत म्हणून धावा मालक एकनाथ चव्हाण यांच्याकडे सुपूर्ती केले. त्यानंतर कांबळे हे पैसे पडल्याचे सांगितल्यावर एकनाथ चव्हाण व पृथ्वीराज खरपी यांनी ते पैसे त्यांना परत दिले.
पृथ्वीराज खरपी याच्या प्रामाणिक पदाबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.